<
जळगांव(प्रतिनिधी)- येथील सिंधी कॉलनी परिसरातील खुशी किराणा या दुकानावर काही महिन्यांपूर्वी छापा टाकून गुटखा, सुगंधीत पान मसाला जप्त करण्यात आला होता. परंतु, कारवाईला काही दिवस होताच पुन्हा परिस्थिती जैसे थे झाली. ही बाब ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश भिवसन महाले यांच्या लक्षात आली असता, त्यांनी खुशी किराणा या दुकानावर बेकायदेशीर विक्री होणाऱ्या गुटखा, सुगंधित पान मसाला, विदेशी सिगारेट विक्री थांबवावी, अश्या आशयाचा तक्रार अर्ज जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक यांना दिला आहे.