<
धुळे(प्रतिनिधी)- तालुक्यातील तांडा कुंडाणे येथील शेतकरी उखा हिरामण पवार वय ५५ यांनी कर्जबाजारी पणाला कंटाळून शेतात विष प्राशन केल्याने मृत्यू झाल्यानेदुर्दैवी घटना घडली. यावेळी घटना कळताच सामाजिक कार्यकर्ते तालुका भाजपा कोषाध्यक्ष कैलास जाधव यांनी दि.३/९/२०१९ रोजी दुपारी २वाजता धुळे सिव्हिल हॉस्पिटल येथे भरती केले असता, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केल्याने शवविच्छेदन करून आज ४/९/१९ रोजी अंत्य संस्कार करण्यात आले. त्यांच्या मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात आली.