Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

ऑटो रिक्षाचालकांना मीटर प्रमाणे भाडे आकारणे बंधनकारक सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गणेश पाटील यांची माहिती

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
02/11/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
निश्चित केलेल्या भाडेदरापेक्षा जादा भाडे आकारणी केल्यास होणार कारवाई

जळगाव(जिमाका वृत्तसेवा)- उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव यांच्याकडून प्रवासी वाहतूकीसाठी परवाना घेतला आहे, अशा सर्व ऑटोरिक्षा चालकांना परवाना अटीप्रमाणे प्रवासी वाहतूक करताना मीटरप्रमाणे भाडे आकारणे (घेणे) बंधनकारक आहे. तसेच प्रत्येक परवानाधारक ऑटो रिक्षाला मोटर वाहन नियमान्वये इलेक्ट्रॉनिक्स मीटर असणे बंधणकारक असून ते सुस्थितीत असणे देखील बंधनकारक आहे, असे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गणेश पाटील यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.

एखाद्या प्रवाशाने मीटरप्रमाणे भाडे देवू असे म्हटल्यास रिक्षा चालकाने मीटरप्रमाणे भाडे घेणे अनिवार्य आहे. ही बाब कायदेशिर आहे. परंतु उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव येथे अनेक प्रवाशांनी तक्रार केली आहे. त्यानुसार रिक्षा चालक मीटरप्रमाणे भाडे घेण्यास नकार देतात. ही बाब रिक्षा परवान्याचे उल्लंघन करणारी आहे.

सर्व ऑटोरिक्षा परवाना धारकांनी 8 नोव्हेंबर 2021 पर्यंत ऑटोरिक्षा फेअरमीटर प्रमाणे इलेक्ट्रॉनिक मीटर अद्ययावत करुन मीटर प्रमाणे भाडे घ्यावे अन्यथा अशाप्रकारचे पालन न करणाऱ्या परवाना धारकाविरुद्ध मोटार वाहन कायाद्यातील तरतुदीनुसार परवाना निलबंनाची दंडात्मक कारवाई करण्यात येईल.

जळगाव शहरात ऑटो रिक्षाचालक प्रवाशांकडून मीटरप्रमाणे भाडे आकारणी करीत नसतील, तर नागरिकांनी अशा ऑटो रिक्षा चालकाविरुद्ध उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 0257-2261819 किंवा [email protected] या संकेतस्थळावर तक्रार करावी. त्यानुसार संबंधित परवाना धारकाविरुद्ध कायद्यातील तरतुदीनुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असेही सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. पाटील यांनी म्हटले आहे.

Team Satymev Jayate

Previous Post

रब्बी हंगामातील पिकांसाठी ३१ डिसेंबरपर्यंत पाणी अर्ज सादर करण्याचे आवाहन

Next Post

अठरावं सरलं…! मतदार यादीत नाव नोंदवलं?

Next Post
अठरावं सरलं…! मतदार यादीत नाव नोंदवलं?

अठरावं सरलं…! मतदार यादीत नाव नोंदवलं?

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo