<
जळगांव(प्रतिनिधी)- आज प्रामुख्याने शिक्षण, घर, आरोग्य, रोजगार अतिशय महत्वाचा विषय आहे. तरी हेच जिव्हाळ्याचे विषय डोळ्यासमोर ठेऊन आपापल्या परीने आपापल्या परिसरात कार्याची सुरवात करुन सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करावा.
१)शिक्षण:- शिक्षणाबाबत समाजातील गरजू मुलांचे विविध शिक्षणासाठी शैक्षणिक पालकत्व घ्यावे. डिग्री, डिप्लोमा, आय.टी. आय आदीबाबत निवासी, कमवा व शिका उपक्रम राबवावे.२)घर:- विविध क्षेत्रातील कॉन्ट्रॅक्टरांनी समाजातील गरजू लोकांना माफक दरात हप्त्याने घर उपलब्ध करुन द्यावे.३)आरोग्य:- समाजातील डॉक्टर बांधवानी गरजू समाज बांधवाला मोफत रुग्णसेवा द्यावी.४)रोजगार:- समाजातील विविध उद्योग-व्यवसायिक कंपनी धारक, विविध उच्च पदस्थ अधिकारी यांनी समाजातील गरजू व्यक्तींना रोजगार उपलब्ध करुन देण्यास प्रयत्नशील असावे.
दैनंदिन जीवन जगत असताना स्वहिताबरोबर इतरांसाठी सुद्धा सामाजिक जाणीवेतून एक समाज ऋण म्हणून आपापल्या परीने समाज हिताच्या दृष्टीने समाजातील गरजवंत लोकांसाठी आपण एक समाज प्रेम, समाज विकास म्हणून आपापल्या क्षेत्रात समाजकार्याची सुरवात करावी. -प्रमोद पाटील