जळगाव – (प्रतिनिधी) – येथे आज 5 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 7 वाजता रेल्वे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून संविधान साक्षरता अभियान दौऱ्याची सुरुवात करण्यात आली . दिनांक 5 नोव्हेंबर 2021 ते 26 नोव्हेंबर 2021 पर्यंत जळगाव ते दिल्ली असा सायकल प्रवास करून राष्ट्रपती भवन येथे महामहिम राष्ट्रपती रामनाथजी कोविंद यांना भारतीय संविधानाची प्रत देऊन दौऱ्याची सांगता होईल.
भारतीय संविधान जनसामान्यांपर्यंत पोहोचावे व त्याची योग्य प्रकारे अंमलबजावणी व्हावी हा उदात्त विचार घेऊन मुकेश कुरील निघालेले आहेत प्रवासादरम्यान लागणाऱ्या वेगवेगळ्या राज्यांमधील विविध जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांनाही या अभियानाची माहिती देऊन संविधान भेट देण्यात येणार आहे मुकेश कुरील यांच्या अभियानास शुभेच्छा देण्यासाठी जळगावातील विविध समविचारी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महानगर अध्यक्ष अनिलभाऊ अडकमोल , कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र तायडे , तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे , छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे , सामाजिक कार्यकर्ते संदीप ढंढोरे , प्रहार जनशक्ती पक्षाचे युवक महानगर अध्यक्ष निलेश बोरा सामाजिक कार्यकर्ते दिलीप अहिरे , जयपाल धुरंधर , भिकन सोनवणे ,संदीप हिरोळे , चंद्रकांत नन्नवरे , प्रताप बनसोडे ,गौतम निकम ,प्रदीप मगरे ,किरण अडकमोल ,विनय निंबाळकर , खुशाल सोनवणे व बि.एम. फाउंडेशनचे सर्व अधिकारी कर्मचारी वर्ग सह सर्व समाजबांधव उपस्थित होते . या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऍड. आनंद सोनवणे तर आभार प्रदर्शन हेमंत बिऱ्हाडे यांनी केले .