<
पुणे : खडकवासला धरणात सोमवारी सकाळी सहा वाजता 51.35 टक्के म्हणजे निम्मे धरण भरले आहे. खडकवासला धरण उपयुक्त पाणी साठा क्षमता 1.97 टीएमसी असून आज या धरणात एक टीएमसी पाणी साठा जमा झाला आहे. या धरणात 24 जून रोजी सर्वात कमी म्हणजे 0.24 टीएमसी म्हणजे 12.13 टक्के पाणीसाठा होता. 14 दिवसात 309 मिलीमीटर पाऊस पडला. आणि आज निम्मे धरण भरले आहे. येथे रविवारी संध्याकाळी 0.88 टीएमसी म्हणजे 44.50 टक्के होते. एक जूनपासून म्हणजे मागील 38 दिवसात धरण परिसरात 365 मिलिमिटर पाऊस पडला आहे. खडकवासला धरणात सरासरी 705 मिलीमीटर पडतो. आज अखेर पडलेला पाऊस निम्मा पाऊस पडला आहे. मागील वर्षी 10 जुलै रोजी एक टीएमसी म्हणजे 51.99 टक्के भरले होते. तर 15 जुलै रोजी 2018 रोजी धरण भरत आल्याने कालव्यातून पाणी सोडण्यास सुरवात केली होती. तर 16 जुलै रोजी खडकवासला धरण 100 टक्के भरले होते. त्यातून 22 हजार 880 क्यूसेक पाणी धरणातून मुठा नदीत सोडले होते.