Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

महिला सरपंचानी नियमांची माहिती व अभ्यासतून गावांचा सर्वागींण विकास करावा -मंत्री सुभाष देसाई

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
09/11/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
महिला सरपंचानी नियमांची माहिती व अभ्यासतून गावांचा सर्वागींण विकास करावा -मंत्री सुभाष देसाई

औरंगाबाद(जिमाका)- महिला सरपंचानी पदाला न्याय देण्यासाठी व जनतेच्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी परिपत्रके, शासन निर्णय यांची माहिती घेऊन गावागावात विकास कामांना गती द्यावी.

पुरोगामी महाराष्ट्रात अनेक समाजसुधारकांच्या विचारातून विविध चालीरिती, प्रथा, परंपरा दूर करुन स्त्री शिक्षण व तिच्या विकासासाठी सर्व क्षेत्रात संधी उपलब्ध करुन देण्यात महाराष्ट्र अग्रेसर राहिल्याने समाजकारण व राजकारणात महिला सरपंच जनतेच्या विश्वासाला पात्र ठरल्या आहेत. यासाठी या महिला सरपंच परिषदेच्या माध्यमातून वितरीत करण्यात आलेल्या माहिती पुस्तिकेचा उपयोग महिला सरपंच विविध योजनां राबविण्यासाठी करतील, असा विश्वास पालकमंत्री सुभाष देसाई यांनी महिला सरपंच परिषदेच्या समारोप कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला.

महिला सरपंचानी वाचन करुन विविध नियमाचा अभ्यास करावा, गावाचा कारभार मजबूतीने व विश्वासाने चालवण्यासाठी कुटुंबातील पुरुषाने यात पती, भाऊ यांनी त्यांना सहकार्य करुन पांठिबा देणे हे तितकच महत्त्वाचे असल्याचे सांगितले. याबरोबरच गावागावात महिला सरपंच असलेल्या गावांना अधिकाऱ्यांनी भेटी देऊन विकास योजना राबविण्यात सहकार्य व मार्गदर्शन करण्याबाबत सांगितले. यासाठी शासनाच्या विविध विभागांच्या निधी बरोबरच पालकमंत्री म्हणून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत निधी देण्याचे आश्वासन यावेळी दिले.

या कार्यक्रमास मंत्री संदीपान भूमरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मीनाताई शेळके, आमदार संजय सिरसाट, आमदार प्रशांत बंब, आमदार उदयसिंह राजपूत, आमदार रमेश बोरनारे, आमदार अंबादास दानवे, आमदार ॲङ मनिषा कायंदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे, व एकूण 529 महिला सरपंच यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमात प्रतिनिधीक स्वरुपात आमदार प्रशांत बंब यांनी सरपंच महिलाना उद्देशून बोलताना सांगितले की, ग्रामसेवकांना मुख्यालयी राहणाच्या सूचना प्रत्येक महिला सरपंचानी करावी, जेणेकरुन गावाच्या विकासकामांना गती मिळेल. तसेच अतिक्रमणे टाळण्यासाठी बांधकाम परवानगी देत असताना मालकी हक्काची खातरजमा केल्याशिवाय परवानगी देऊ नये, जेणेकरुन भविष्यात गावाना इतर समस्या निर्माण होणार नाही.

आमदार संजय सिरसाट यांनी महिला सरपंचानी आपले अधिकार वापरावेत. जीवनात सरपंच पदाची मिळालेली ही संधी असून आपल मत मांडायला शिकले पाहिजे. चांगल्या व प्रामाणिक कार्यातून आपले नेतृत्व गुणाचा विकास होतो, असे यावेळी मार्गदर्शन करताना सांगितले.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे यांनी केले यावेळी लसीकरणात औरंगाबाद जिल्ह्याचे प्रमाण वाढविण्यासाठी महिला सरपंचानी पुढाकार घ्यावा असे आवाहनही केले. महिला सरपंच परिषदेची सागंता राष्ट्रगीतानी झाली.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

आरोग्य क्षेत्रात कौशल्य विकास प्रशिक्षणाची संधी इच्छुकांनी नोंदणी करण्याचे आवाहन

Next Post

राज्यपालांच्या हस्ते पब्लिक रिलेशन कौन्सिलचे पुरस्कार प्रदान

Next Post
राज्यपालांच्या हस्ते पब्लिक रिलेशन कौन्सिलचे पुरस्कार प्रदान

राज्यपालांच्या हस्ते पब्लिक रिलेशन कौन्सिलचे पुरस्कार प्रदान

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d