<
पाचोरा(प्रतिनिधी)- पाचोरा नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा ध्वज आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली डौलाने फडकत असून आगामी पाचोरा नगरपालिका निवडणूक शिवसेना संपूर्ण प्रभागात स्वबळावर लढविणार असल्याचे निश्चित केलेले आहे.
पाचोरा शहरातील सर्वच प्रभागातून तुल्यबळ उमेदवार शिवसेनेकडे उमेदवारीची मागणी करीत आहेत. याचा धसका घेऊन विरोधकांचे धाबे दणाणले असून त्यांच्याकडून कुटील कारस्थानातून अफवा पसरविण्याचे महापाप करीत आहे. शिवसेना स्वत्रंतपणे नगरपालिका लढिवणार आहे. यश देखील शिवसेनेचेच असेल. गेल्या सात वर्षांपासून पाचोरा-भडगाव विधानसभेचे मतदार संघांचे कार्यसम्राट, लोकप्रिय, आमदार महोदयांनी पाचोरा शहराचा कायापालट केलेला आहे.
पाचोरा शहरातील प्रत्येक प्रभाग मध्ये विकासकामे पूर्ण झालेली आहेत. शेकडो कोटी रुपयांचा निधी आमदार साहेबांनी पाचोरा शहरासाठी उपलब्ध करून दिलेला आहे. भाजी मंडी परिसरामध्ये सुविधायुक्त असे भव्य दिव्य कै.बापूसाहेब के.एम.पाटील व्यापारी संकुलाचे निर्माण केलेले आहे. राजीव गांधी टाऊन हॉल व व्यापारी संकुल निर्माण करून छोटे-मोठे व्यापारी,टपरी धारकांना न्याय मिळाला असून शहराच्या सौंदर्यात भर पडली आहे. खरेदी करतांना नागरिकांच्या चेहऱ्यावरील आनंद दिसून येतो. पाचोरा शहरातील सांडपाणीची विल्लेवाट संपूर्ण शहरात ड्रेंनजचे काम पूर्णत्वाला नेलेले आहेत.
२४ तास वीजपुरवठा, छत्रपती शिवाजी महाराज व बाबासाहेब आंबेडकर पुतळा सुभोभिकरण, हुतात्मा स्मारक,राजेसंभाजी महाराज चौक सुभोभिकरण,अद्यावत वाचनालय, कृष्णापुरी पुलांचे व पांचाळेस्वर पूल आदी पुलांचे निर्माण प्रगतीपथावर आहे.पिण्याच्या पानाच्या प्रश्न कायमचा मिटवलेलें आहे. ओपन स्पेस सुशोभीकरण आदी अनेक विकासकामे पूर्ण करून आमदार महोदयांनी जनतेला दिलेले विकासाचे वचन पूर्ण केलेले आहे. उत्तर महाराष्टरातील पाचोरा शहर सर्वाधीक सुंदर शहर बनविण्याचे स्वप्न असून त्याकामी नागराध्यक्ष संजय गोहिल व पाचोरा शहरातील शिवसेना नगरसेवक कामाला लागले आहेत.
पाचोरा शहरातील सर्वच प्रभागामध्ये शिवसंवाद बैठकीचे आयोजन मुकुंद बिल्दीकर , संजय गोहिल यांच्या नेतृवाखाली संपन्न झालेले असून शिवसैनिकांचा व जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळालेला असून त्यावेळी जनतेच्या अडचणी व समस्या जाणून घेतल्या. तत्परतेने सोडविण्यासाठी शिवसेना पदाधिकारी कार्यरत झालेली आहेत. अकस्मात आलेला कोरोना १९ महामारीच्या काळात किशोर आप्पा पाटील यांनी स्वखर्चाने कोविड रुग्णांना अत्यावश्यक औषधीचा पुरवठा केला असून परिवारासाठी किराणा वाटप केले तथा पाचोरा शहरात रुग्णाच्या सोबत असेल्या नातेवाईकांना व शहरातील गोरगरीब जनतेस अन्नदान देखील केले.
शिवसेनेचे ८० % समाजसेवा २०% राजकारण हे ब्रीदवाक्य ध्यानी ठेऊन शिवसेना पक्षाच्यावतीने पाचोरा शहराचा विकास सुरु आहे. मतदीचा हात देखील आहे. म्हणून शिवसेना पक्षाने केलेल्या विकास कामांच्या जॊरावर तथा समाजसेवेच्या भरोशावर, जनतेच्या आशीर्वादाने भक्कम पाठींबाण्यानें स्वत्रंतपणे आगामी काळात पाचोरा नगरपालीका निवडणूक शिवसेना लढविण्याचे कार्यकर्ता व पदाधिकारी बांधवानी चंग बांधलेला आहे. मायबाप जनता शिवसनेच्या पाठीशीच आहे. याचा आम्हाला मनापासून विश्वास आहे.