<
जळगाव-(प्रतिनिधी) – पर्यावरणाचा संदेश देश अनुभूती इंटरनॅशनल रेसिडेंसीयल स्कूलच्या 5 वी ते 8 वीच्या 50 हून अधिक विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी शाडू मातीपासून बाप्पाच्या मूर्ती साकारल्या. दरवर्षाप्रमाणे यावर्षीही इको फ्रेंडली गणेशोत्सव अनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून साजरा करण्यात येत आहे.
अनुभूती निवासी शाळेमध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेने विविध प्रकारच्या अप्रतिम बाप्पाच्या मूर्ती साकारल्या. यासाठी रविंद्र कुलथे यांनी गेल्या पंधरा दिवसांपासून मुलांना मार्गदर्शन केले. शाडूच्या मूर्ती बनविण्याचा उपक्रम गेल्या चार वर्षापासून राबवित असल्याचे कलाशिक्षक सचिन राऊत यांनी सांगितले. शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेने गणरायाच्यामूर्ती साकारल्या आहेत. त्यातलालबागचा राजा, दगडूशेठ, डमरू वाजवताना, बासरी वाजवताना, काही विद्यार्थ्यांनी कृष्णाचे रूप घेतलेला गणपती तर काही जणांनी उंदरावरून उडी मारताना अशा प्रकारच्या विविध ५० हून अधिक मूर्ती ५ वी ते ८ वी च्या विद्यार्थ्यांनी तयार केल्या व त्यांना पोस्टर कलरने विविध छटा तयार करून रंगविले. कलाशिक्षक सचिन राऊत, रामनिरंजन महातो, प्रितम दास तसेच शाळेतील सहकारी यांनी सहकार्य केले. उपक्रमाबद्दल शाळेच्या संचालिका सौ. निशा जैन, प्राचार्य जे. पी. राव यांनी सर्वांना कौतुक केले.