<
रावेर(प्रतिनिधी)- दिनांक 17 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर दरम्यान कोल्हापूर येथे राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा होवू घातलेल्या आहेत त्या अनुषंगाने आज रावेर येथील सरदार जी. जी. स्पोर्ट्स क्लब व महाराष्ट्र राज्य टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय निवड चाचणी आयोजित करण्यात आली. यात 14 व 17 वर्ष वयोगट अशा दोन गटांत खेळाडूंची निवड करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रावेर शिक्षण संवर्धक संघाचे चेअरमन प्रकाशजी मुजूमदार हे होते. तर कार्यक्रमाचे उद्घाटन रावेर शिक्षण संवर्धक संघाचे उपाध्यक्ष अशोक शेठ वाणी यांनी केले. तसेच कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती संस्थाचालक शितल वाणी, संतोष शेठ अग्रवाल, विकास देशमुख, प्रकाश जोशी अंबिका व्यायाम शाळेचे अध्यक्ष भास्कर पहेलवान सरदार जी जी हायस्कूल चे मुख्याध्यापक शिरीष वाणी, कमलाबाई गर्ल्स हायस्कूलचे मुख्याध्यापक जयंत कुलकर्णी, सरदार जी जी हायस्कूलचे उपमुख्याध्यापक टी.व्ही महाजन, पर्यवेक्षक ई.जे. महाजन, एस.पी. पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाशजी मुजुमदार तर कार्यक्रमाचे उद्घाटक अशोक शेठ वाणी यांच्या हस्ते क्रिकेट ग्राऊंडचे पूजन करून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली.
स्पर्धा यशस्वी होण्यासाठी जे.के. पाटील, युवराज माळी, अजय महाजन, प्रतिक खराले, हेमंत देव, जयेश बिरपन, दीपक जाधव व सरदार जी जी स्पोर्ट्स क्लब च्या सर्व खेळाडूंचे सहकार्य लाभले. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य टेनिस बॉल असोसिएशनचे सचिव वासेफ पटेल यांनी खेळाडूंना क्रिकेट स्पर्धेबद्दल माहिती देवून निवड चाचणीला सुरुवात केली तर निवड चाचणी साठी साजिद तडवी व प्रतिक खराले यांनी काम पाहिले. निवड झालेल्या खेळाडू हे जळगाव जिल्ह्याचे नेतृत्व करण्यासाठी कोल्हापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत आपली कामगिरी बजावणार आहे. निवड झालेल्या खेळाडूंना संस्थेचे चेअरमन प्रकाशजी मुजूमदार तथा सर्व संचालक मंडळातर्फे व सरदार जी जी स्पोर्ट्स क्लब तर्फे पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.