Tuesday, March 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांना शासकीय वसतिगृह बोरिवली येथे प्रवेश अर्जाबाबत आवाहन

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
12/11/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांना शासकीय वसतिगृह बोरिवली येथे प्रवेश अर्जाबाबत आवाहन

मुंबई(प्रतिनिधी)- नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांकरिता मागासवर्गीय महिलांचे वसतिगृह, बोरिवली या वसतिगृहात प्रवेशासाठी प्रवेश अर्ज मागविणे सुरू आहे.तरी इच्छुक महिलांनी अर्ज करावेत असे आवाहन सहायक आयुक्त समाज कल्याण, मुंबई उपनगर यांनी पत्रकाद्वारे केले आहे.

वसतिगृहामधील प्रवेशासाठी नियमावली पुढीलप्रमाणे अर्जदार महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी. अर्जदार महिला अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, अनाथ या वर्गवारीतील असावी. अर्जदार महिला ज्या ठिकाणी नोकरी करीत असेल, तेथील सक्षम अधिकाऱ्याने दिलेले नेमणुकीच्या अथवा बदलीच्या आदेशाची प्रत अथवा रूजू झाल्याबाबतचे प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करणे बंधनकारक असेल.

अर्जदाराचे जवळचे नातेवाईक उदा. आई, वडील, पती हे संबंधित महानगरपालिका क्षेत्राच्या हददीत रहात नसावेत.अर्जदार नोकरी करणाऱ्या महिलेचे मासिक उत्पन्न हे रु. ३०,०००/- पेक्षा जास्त नसावे. अशा महिलांचे मासिक उत्पन्न यापेक्षा जास्त झाल्यास त्यांना वसतीगृह सोडावे लागेल.काम करणाऱ्या महिला जास्तीत जास्त तीन वर्षापर्यंत या वसतिगृहात राहण्याची मुभा राहील.त्यानंतर त्यांना निवासस्थान सोडणे अनिवार्य राहील.वसतिगृहात प्रवेश घेतेवेळी रु.५०००/- इतकी रक्कम अनामत रक्कम म्हणून वसतिगृहात व्यवस्थापकांकडे जमा करावी लागेल.

इच्छुक पात्र महिलांनी विहित नमुन्यातील अर्ज करताना पुढील कागदपत्र आवश्यक आहेत.अर्जदार ज्या ठिकाणी काम करीत आहे तेथील सक्षम अधिकाऱ्याचे दिलेले नेमणुकीचे अथवा बदलीचे आदेश तसेच तेथे रुजू झाल्याबाबतचे प्रमाणपत्र,वेतनाचे प्रमाणपत्र,सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्याने विहीत नमुन्यात दिलेला वैद्यकीय दाखला, दोन पासपोर्ट फोटो,ओळखपत्र (पासपोर्ट/ आधारकार्ड/संबंधित प्राधिकरणाने दिलेले ओळखपत्र) अधिक माहितीकरिता सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई उपनगर, प्रशासकीय इमारत, ४ था मजला, आर.सी.मार्ग, चेंबूर (पू.), मुंबई-७१ येथे संपर्क साधावा असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाजकल्याण मुंबई उपनगर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या जालना-नांदेड द्रुतगती महामार्गासाठी ‘या’ तीन जिल्ह्याच होणार भूसंपादन

Next Post

वंचित बहुजन आघाडीचा एल्गार; जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद स्वबळावर लढविणार

Next Post
वंचित बहुजन आघाडीचा एल्गार; जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद स्वबळावर लढविणार

वंचित बहुजन आघाडीचा एल्गार; जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद स्वबळावर लढविणार

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d