Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

वंचित बहुजन आघाडीचा एल्गार; जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद स्वबळावर लढविणार

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
13/11/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
वंचित बहुजन आघाडीचा एल्गार; जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद स्वबळावर लढविणार

पाचोरा(प्रतिनिधी)- येथे वंचित बहुजन आघाडीतर्फे स्व.राजीव गांधी टाऊन हॉल येथे भव्य मेळावा घेण्यात आला. यावेळी बहुजन वंचित आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद इंगळे अध्यक्षस्थानी होते. तसेच जिल्हा कार्यालय सचिव वैभव शिवतारे, जितेंद्र केदार, अनिल केंद्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी वैभव शिवतारे यांनी वंचित बहुजन आघाडीचे केलेल्या कामांची माहिती दिली. तसेच कार्यकर्त्यांना न्याय देण्याचे काम वंचित बहुजन आघाडी करीत आहे. जिल्हाध्यक्ष आपल्या मार्गदर्शनात कार्यकर्त्यांना महत्वाचे स्थान देऊन त्यांना सहकार्य केले पाहिजे, कार्यकर्त्यांमुळे पक्ष वाढीला जातो वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात पक्ष वाढवण्याचे काम जोरदार आहे तसेच कार्यकर्त्यांवर अन्याय होत असेल तर पक्ष हा सर्वांच्या पाठीशी आहे असे वक्तृत्व प्रमोद इंगळे यांनी कार्यकर्त्यांना दिले.

यावेळी पक्षामध्ये अनेकांनी प्रवेश केला. आलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या मेळाव्यात वंचित बहुजन आघाडीत येणाऱ्या सर्व निवडणुका स्वबळावर लढणार असून कार्यकर्त्यांनी आतापासून मोर्चा बांधणीला लागावे, यावेळी वंचित बहुजन आघाडी ची तालुका कार्यकारणी जाहीर केली.या मेळाव्याचे आयोजन विशाल बागुल यांनी केले होते. यावेळी विशाल बागुल यांनी सांगितले की संपूर्ण तालुक्यात वंचित बहुजन आघाडीची मोठी साखळी तयार करून प्रत्येकाला न्याय देण्यासाठी काम करत राहणार.

सुत्रसंचालन शांताराम चौधरी तर आभार विशाल बागुल यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी निलेश मराठे, प्रमोद सोनवणे, गौतम बागुल आदिंनी परिश्रम घेतले. यावेळी मोठ्या संख्येने तरुणांनी सहभाग नोंदविला.

Team Satymev Jayate

Previous Post

नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांना शासकीय वसतिगृह बोरिवली येथे प्रवेश अर्जाबाबत आवाहन

Next Post

टी.आर.पाटील विद्यालयात राष्ट्रीय संपादनणूक NAS परीक्षा संपन्न

Next Post
टी.आर.पाटील विद्यालयात राष्ट्रीय संपादनणूक NAS परीक्षा संपन्न

टी.आर.पाटील विद्यालयात राष्ट्रीय संपादनणूक NAS परीक्षा संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo