<
जळगाव(प्रतिनिधी)- जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनतर्फे दरवर्षी दिले जाणारे जिल्हास्तरीय उत्कृष्ठ ॲथलेटिक्स खेळाडू पुरस्कार,जिल्हास्तरीय उत्कृष्ठ ॲथलेटिक्स क्रीडा मार्गदर्शक व जिल्हास्तरीय उत्कृष्ठ ॲथलेटिक्स क्रीडा संघटक पुरस्कार २०२० नुकतेच जळगाव जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे सचिव राजेश जाधव यांनी जाहीर केले.
शालेय गट, महाविद्यालयीन गट, खुला गट तसेच क्रीडा मार्गदर्शक व क्रीडा संघटक असे पुरस्कार दिले जातात. यात शालेय गटातील जिल्हास्तरीय उत्कृष्ठ खेळाडू पुरस्कार धरणगाव येथील सारजाई कुडे विद्यालयाची हर्डल्सची खेळाडू मयुरी भगवान सावंत, महाविद्यालयीन गटातील जिल्हास्तरीय उत्कृष्ठ ॲथलेटिक्स खेळाडू पुरस्कार रावेर येथील व्ही.एस.नाईक महाविद्यालयाचा लांबउडीचा खेळाडू आदित्य मोहनदास महाजन, खुल्या गटातील जिल्हास्तरीय उत्कृष्ठ ॲथलेटिक्स खेळाडू पुरस्कार राष्ट्रीय लांब पल्याचा धावपटू संजय मधुकर तायडे तर जिल्हास्तरीय उत्कृष्ठ ॲथलेटिक्स क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार मेहरून येथील जयदुर्गा विद्यालयाचे क्रीडाशिक्षक निलेश श्रीराम पाटील तर जिल्हास्तरीय उत्कृष्ठ ॲथलेटिक्स संघटक पुरस्कार रिंगणगाव येथील आर.एन.पाटील विद्यालयाचे क्रीडाशिक्षक सचिन रमेश महाजन यांना जाहीर करण्यात आले.
जळगाव जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनला संलग्न असणाऱ्या खेळाडूंची त्या त्यावर्षी उच्चतम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची कामगिरी विचारात घेतली जाते यंदा कोविड १९ मुळे सन २०१८ ते २०२० ची कामगिरी विचारात घेण्यात आली पुरस्कार प्रस्ताव निवड समिती सदस्य म्हणून डॉ.पी आर चौधरी, राष्ट्रीय खेळाडू PSI भगवान कोळी, राष्ट्रीय खेळाडू अनिल पठाडे, राष्ट्रीय पंच डॉ.कांचन विसपुते यांनी काम पाहिले. सदर पुरस्काराचे वितरण एका कार्यक्रमाचे आयोजन करून करण्यात येईल.