Tuesday, March 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

दूध संघामार्फत ९०% मादी वासरे पैदासीसाठी विर्यमात्रा उपलब्ध

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
13/11/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
दूध संघामार्फत ९०% मादी वासरे पैदासीसाठी विर्यमात्रा उपलब्ध


जळगाव (जिल्हा प्रतिनिधी) : केंद्र साहाय्यित योजना राष्ट्रीय गोकूळ मिशन अंतर्गत लिंग विनिश्चित वीर्यमात्राचा (सेक्स सॉर्टेड सिमेन) गायी व म्हशी मध्ये कृत्रीम रेतनासाठी वापर करण्यासाठी चा उद्घाटन कार्यक्रम संघाच्या आवारात सुविधा भवन येथे दिनांक १३/११/२०२१ रोजी दुपारी ३.०० वाजता आयोजीत करण्यात आलेला होता.

या कार्यक्रमाचे उद्घाटन जळगांव दूध संघाचे चेअरमन वसंतराव मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास संघाचे कार्यकारी संचालक मनोज लिमये तसेच जिल्हा पशुसंर्वधन उपआयुक्त कार्यालयाचे प्रतिनिधी डॉ. निलेश चोपडे व जिल्हा कृत्रीम रेतन अधिकारी डॉ. प्रदिप पाटील व संघाचे अधिकारी, दूध संस्थांचे चेअमन, प्रगतीशील दूध उत्पादक व संघाचे कृत्रीम रेतन तंत्रज्ञ उपस्थित होते.

लिंग विनिश्चित वीर्यमात्रा तयार करण्यासाठी मोठा खर्च येत असतो. मात्र यासाठी केंद्र शासन रु.२६१, राज्य शासन रु.१४० व जळगांव दूध संघ रु.१०० एकूण असे रु. ५०१ अनुदान प्राप्त होणार आहे . दूध उत्पादकांना विर्यमात्रा फक्त रक्कम रु. ८१/- उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. परंतु केंद्र शासनाने देशात दूध उत्पादन वाढविण्यासाठी नविन प्रणालीचा वापर करण्यास प्रोत्साहन दिलेले आहे. या योजनेतून ९० टक्के मादी वासरांची अचूकतेसह निर्मिती, उच्च अनुवंशिक मादी वासरांची उत्पत्ती करुन दूध उत्पादन व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे तसेच दूग्ध व्यवसाय करण्या इच्छूक असलेल्या शेतकरी व दूध धंदा व्यवसायिक उच्च अनुवंशिक वासरांची वाढीव उपलब्धता आदी फायदे होणार आहेत.

सध्या संघाकडे गिर, सहिवाल, जर्सी ५० टक्के, जर्सी १०० टक्के व मुऱ्हा या जातीच्या लिंग विनिश्चित विर्यमात्रा उपलब्ध झालेल्या आहेत. तरी सदर लिंग विनिश्चित विर्यमात्रा वापरासाठी शासनाच्या सुचनाप्रमाणे वापर करण्याबाबत मार्गदर्शन केले. सदरील योजना प्रायोगितत्वावर असल्यामुळे मर्यादित ठिकाणीच उपलब्ध करुन देण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी जागरुक राहून आपल्या निरोगी जनावरांस कृत्रीम रेतन करुन घेणेबाबत आवाहन दूध संघामार्फत करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमासाठी भालोद, कोल्हाडी, न्हावी, साजगांव, तारखेडा, डांगरी, देवगांव, तरडी, कुंवारखेडा, चहार्डी, कासोदा, या संस्थाचे प्रतिनिधी , कृत्रीम रेतन तंत्रज्ञ व संघाचे अधिकारी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन

Next Post

बांभोरी प्र.चा.ग्रामपंचायतने अंगणवाडी व जि. प.शाळेत ‘बाल दिन’ केला साजरा

Next Post
बांभोरी प्र.चा.ग्रामपंचायतने अंगणवाडी व जि. प.शाळेत ‘बाल दिन’ केला साजरा

बांभोरी प्र.चा.ग्रामपंचायतने अंगणवाडी व जि. प.शाळेत 'बाल दिन' केला साजरा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d