<
बांभोरी – (प्रतिनिधी) – भारत देशाचा स्वातंत्र्यचा 75 अमृत महोत्सव वर्षात बांभोरी प्र.चा.ग्रुपग्रामपंचायत विविध कार्यक्रम चे आयोजन करीत आहे.
14 नोव्हेंबर हा दिवस भारताचे पहिले पंतप्रधान प.जवाहरलाल नेहरू यांचा जन्म दिन संपूर्ण भारतात ” बाल दिन” म्हणून साजरा करतात.म्हणून बांभोरी प्र.चा.ग्रुपग्रामपंचायत ने अंगणवाडी व जि.प.शाळेत बाल दिन साजरा केला.यावेळी गावातील अंगणवाडी मधील 12 कुपोषित मुलांना ग्रामपंचायत ने दत्तक घेऊन त्यांना 1 कॅरेट अंडी,खजूर,काळे मनुके,प्रोटीन पाकीट दिले. पोषण आहार, उत्तम आरोग्य,शिक्षण, मिळणे हे प्रत्येक बालकाचा मूलभूत अधिकार आहे म्हणून कुपोषण दूर करण्यासाठी सर्व प्रकारच्या उपाययोजना ग्रामपंचायत तर्फे करण्यात येतील व (14 नोव्हेंबर) बाल दिन ते (20 नोव्हेंबर)बाल हक्क दिन हा बाल अधिकार सप्ताह साजरा करण्यात येईल असे सरपंच श्री.सचिन बिऱ्हाडे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.
यावेळी ग्रामविकास अधिकारी श्री.दीपक पाठक, ग्रामपंचायत सदस्य श्री.संदीप कोळी,मुख्यध्यपिका सौ.तडवी मॅडम,व जी.प.शाळेतील शिक्षक वृंद,सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस, व सर्व पालक-बालक यांची प्रमुख उपस्थिती होती.