<
जळगांव(प्रतिनिधी)- मुले ही देवाघरची फुले असे मानणारे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान तसेच मुलांचे आवडते चाचा – पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती बालदिन म्हणून केसीई सोसायटी संचलित गुरुवर्य प.वि. पाटील विद्यालय जळगाव येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
सर्वप्रथम शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका सरला पाटील यांच्या हस्ते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कालियामर्दन भक्त प्रल्हाद बाळ श्रावण बाळ आजीबाईच्या गोष्टी कृष्ण सुदामा आदी पौराणिक बालकथा ऑनलाइन सेशनच्या माध्यमातून सांगितल्या.
उपशिक्षक योगेश भालेराव यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कार्याची माहिती दिली तर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले प्रसंगी मुख्याध्यापिका रेखा पाटील, उपशिक्षक अशोक चौधरी, कल्पना तायडे, धनश्री फालक, सूर्यकांत पाटील, दिपाली चौधरी, स्वाती पाटील, सुनील नारखेडे, सुधीर वाणी आदी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.