<
भडगाव(प्रतिनिधी)- कोरोना सारख्या महाभयंकर संकटाने असंख्य सुशिक्षित तरुणांना बेरोजगार करून आर्थिक दृष्ट्या घेरले आहे. ते बेरोजगार तर आहेतच पण त्याहून जास्त तीव्र झळ आर्थिक दृष्ट्या ग्रामीण भागातील तरुणांना जास्त बसत असल्याने प्रहार जनशक्ती पक्ष जळगाव व साधनाई फाउंडेशन भडगाव यांनी ही बाब हेरून बेरोजगारी दूर व्हावी आणि तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी पि.आर. एम्.सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांच्या अंतर्गत प्रहार जनशक्ती पक्ष जळगाव व साधनाई फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १८ नोव्हेंबर रोजी भडगाव येथे डी. एड. कॉलेजच्या पटांगणात दुपारी १२ ते ४ या वेळात आयोजित केला आहे.
जळगाव जिल्हा हा जास्तीत जास्त शेतीवर अवलंबून असलेला व इतर आर्थिक स्रोत नसलेला जिल्हा आहे. त्यातच जिल्ह्यात पूरग्रस्त संकट, त्यात अतिवृष्टी आणि शेतीचे अतोनात झालेले नुकसान, ह्या सर्व बाबींचा विचार करून शेतकरी वा इतर तरुण बांधवांनी खचून न जाता त्यांना उभे करून संधी उपलब्ध करून देण्यासाठी हा नोकर भरती मेळावा आयोजित केल्याचे साधनाई फाउंडेशन अध्यक्ष व जिल्हा बँक संचालक नानासाहेब प्रतापराव हरी पाटील आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे जळगाव जिल्हाध्यक्ष विजयकुमार रायभान भोसले यांनी सांगितले. तसेच जास्तीत जास्त सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी याचा लाभ घ्यावा व नोकरीची संधी उपलब्ध करून घ्यावी ही इच्छा व्यक्त केली. या होणाऱ्या मेळाव्यासाठी फाऊंडेशनचे व प्रहारचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते परिश्रम घेताना दिसून येत आहेत.