<
पाचोरा – येथील भारतीय जनता पार्टी महिला आघाडी पाचोरा यांचे तर्फे युवानेते व भाजपा पाचोरा चे तालुकाध्यक्ष अमोल भाऊ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त महिला बचत गटासाठी आयोजित उद्योग मार्गदर्शन मेळावा उत्साहात संपन्न झाला. काल दिनांक 14 नोव्हेंबर रोजी महालपुरे मंगल कार्यालयात संपन्न झालेल्या या मेळाव्याला सुमारे 1200 बचत गट सदस्य महिलांनी हजेरी लावली.
भाजपाचे खासदार उन्मेष दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या उद्योग मार्गदर्शन मेळावा प्रसंगी प्रमुख वक्त्या व उद्योग मैत्रीण मासिकाच्या संपादिका सारिका भोईटे-पवार, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस मधुभाऊ काटे, पंचायत समिती सदस्य बन्सीलाल पाटील, व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष कांतीलाल जैन, युवानेते व भाजपा तालुकाध्यक्ष अमोल भाऊ शिंदे, डॉक्टर भूषण दादा मगर , शहराध्यक्ष रमेश वाणी , महिला आघाडी जिल्हाध्यक्ष रेखाताई पाटील, ज्योतीताई चौधरी, संगीता वाणी, वैशालीताई जडे , सुवर्णा ताई पाटील, डॉक्टर अनुजा देशमुख, उषाताई पाटील, प्रियंका इंगळे व प्राजक्ता इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते.
दीपप्रज्वलनाने कार्यक्रमास सुरवात झाली. याप्रसंगी बचत गटांच्या वतीने मीनाक्षी पाटील व भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्ष रेखा ताई पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
उद्योग मैत्रीण मासिकाच्या संपादिका सारिका भोईटे-पवार यांनी आपल्या दीड तासाच्या मनोगतात उपस्थित महिलांना अत्यंत ओघवत्या शब्दात मार्गदर्शन केले. ” महिला घरी बसून फावल्या वेळेत दररोज सहज कोणकोणते व्यवसाय व अर्थार्जन करू शकतात..? याबाबत मार्गदर्शन केले. तसेच कोणताही व्यवसाय करताना तो यशस्वी होण्यासाठी सुमारे एक हजार दिवसांचा कालावधी लागतो, त्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून व्यवसायात सातत्य ठेवावे- असा सल्ला त्यांनी उपस्थितांना दिला. बचत गटांसाठी सहज साध्य व्यवसायांची माहिती त्यांनी यावेळी दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार उन्मेषदादा पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात खानदेशातील महिलांसाठी सहज साध्य घरगुती व्यवसाय व शासनाच्या विविध योजना याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे युवा नेते अमोल भाऊ शिंदे यांनी प्रास्ताविक केले. शिवाजी शिंदे यांनी सूत्रसंचालन व आभार प्रकटन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सुनिता पाटील, फरहाना आसिफ खान, प्रभावती भडगावकर, राजश्री पाटील, ललिता पाटील, मीनाक्षीताई, आशाताई चौधरी , सोनाली राजपूत , सुनिता पाटील, सिंधुबाई बडगुजर आदींनी परिश्रम घेतले.