<
जळगांव(प्रतिनिधी)- महान आदिवासी नेते जननायक बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त संविधान जागर समिती व विविध संघटनांतर्फे अभिवादन करण्यात आले. वीर सावरकर रिक्षा युनियनचे जिल्हाध्यक्ष दिलीप सपकाळे यांच्या हस्ते बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व सर्व उपस्थितांनी प्रतिमेला पुष्प अर्पण करत अभिवादन करून करण्यात आली.
तद्नंतर महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे यांनी बिरसा मुंडानी इंग्रजांविरुद्ध विद्रोह पुकारून लगान माफीचे केलेले आंदोलन आदिवासी समुदायाला न्याय देणारे ठरले असे विचार मांडत त्यांच्या जिवनकार्यावर प्रकाशझोत टाकला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे यांनी केले. सूत्रसंचालन संविधान जागर समितीचे सचिव हरिश्चंद्र सोनवणे यांनी केले तर आभार प्रदर्शन भारत ससाणे यांनी मानले.
प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते सुधाकर सपकाळे , फारुख कादरी, निलेश बोरा, आकाश सपकाळे, दत्तू सोनवणे, कृष्णा जमदाडे, प्रथम लोखंडे, विवेक चौधरी, जितेंद्र भालेराव, सचिन अहिरे, सागर अहिरे, विक्की मोरे, अतुल पाटिल आदी उपस्थित होते.