<
जळगांव(प्रतिनिधी)- १४ नोव्हेंबर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या केल्या जाणाऱ्या बालदिनाचे औचित्य साधून जळगांव येथील रॉबिनहूड आर्मीने जादूगाराच्या कार्यक्रमाचे आयोजन करून अगदी अनोख्या पद्धतीने बालदिवस साजरा केला. मुलं म्हणजे देवा घरची फुलं’जवाहरलाल नेहरूंचे मुलांवरील प्रेम पाहता दरवर्षी विविध उपक्रम घेऊन बालदिवस साजरा केला जातो.
जळगांव येथील समता नगर परिसरात रॉबिन हूड आर्मीतर्फे प्रसिद्ध जादूगार अविनाशजी दुसाने यांच्या मॅजिक शोचे आयोजन केले गेले. रॉबिन हूड आर्मीच्या सदस्या संगीता चावला यांनी अविनाशजींचे स्वागत करत कार्यक्रमाला सुरुवात केली. अविनाशजींनी वेगवेगळे जादू प्रस्तुत केले व खूप मजेदार गोष्टी सांगितल्या.
मुलांनी तसेच परिसरातील लोकांनी कार्यक्रमाचा आनंद घेतला.खाऊ वाटप करून बालदिन मजेत साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला दर्शन जैन, इरफान पिंजारी, दीपक अहुजा, अमित गगनानी, नयन गांधी, दिव्या भोसले, धनश्री माळी, आशिष पाटील, संगीता चावला, काजल रावलानी, अनुप तेजवानी, गौरव लावंगे, आरोही नेवे, ऐश्वर्या पाटील, नितीन पाटील, किरण तायडे, जितेंद्र साळुंखे, नयनकुमार पाटील, सागर बामरूळे, अलफिज पटेल, रितेश पाटील, अमोल नेवे, श्री सोनार या रॉबिन्सची उपस्थिती होती व सर्वांनी मिळून परिश्रम घेतले.