<
जळगाव(जिमाका वृत्तसेवा)- कृषी विभाग, जळगाव, कृषि विज्ञान केंद्र, ममुराबाद व पाल ( रावेर) यांचे संयुक्त विद्यमाने एक दिवसीय रब्बी पूर्व हंगामी हरभरा व कांदा उत्पादन तंत्रज्ञान कार्यशाळा- 2021 चे आयोजन बुधवार 17 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 10 वाजता नियोजन भवन, जळगाव येथे करण्यात येणार आहे.
या कार्याशाळेत हरभरा, कांदा व गहू पिकाचे उत्पादन तंत्रज्ञान, बीबीएफ यंत्राव्दारे हरभरा लागवड, किडरोग एकात्मिक व्यवस्थापन, बियाणे उत्पादन कार्यक्रम व प्रमाणिकरण व इतर अनुषंगिक घटकांबाबत माहिती देण्यात येणार आहे.
हरभरा व कांदा पिकांबाबत डॉ.एन.एस. कुटे, कडधान्य पैदासकर, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, डॉ. दत्तात्रय वने, प्रगतीशील शेतकरी, राहुरी, डॉ. हेमंत बाहेती, वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा कार्यक्रम समन्वयक, कृषि विज्ञान केंद्र, ममुराबाद, वैभव शिंदे, विषय विशेषज्ञ, कृषि विज्ञान केंद्र, ममुराबाद, हितेंद्र सोनवणे, विभागीय बीज प्रमाणिकरण अधिकारी, जळगाव तसेच गहु पिकाबाबत प्रा.अतुल पाटील, विषय विशेषज्ञ, कृषि विज्ञान केंद्र, पाल (रावेर) व संभाजी ठाकूर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
या कार्यशाळेचे प्रसारण ऑनलाईन प्रणालीव्दारा यु-टयुब चॅनल वर https://youtu.be/tLv६JcUeL८s या लिंकव्दारे सुध्दा करण्यात येणार आहे. जिल्हयातील जास्तीतजास्त शेतकरी बांधवांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर व कृषि उपसंचालक अनिल भोकरे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.