Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान प्रक्रियेत अधिकाधिक युवकांचा सहभाग आवश्यक -प्रधान सचिव

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
16/11/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
अठरावं सरलं…! मतदार यादीत नाव नोंदवलं?

कोल्हापूर(जिमाका)- मतदार यादीत युवकांचे प्रमाण कमी आहे, ही चिंतेची बाब आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान प्रक्रियेत युवकांचा सहभाग आवश्यक असून अधिकाधिक युवकांनी मतदार नोंदणी करुन घ्यावी, असे प्रतिपादन प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले.करवीर तालुक्यातील उंचगाव येथे प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या उपस्थितीत विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाबाबत ‘विशेष ग्रामसभा’ पार पडली, यावेळी ते बोलत होते.

या ग्रामसभेमध्ये जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे, करवीर विभागाचे उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, तहसीलदार शितल मुळे-भामरे, सरपंच मालूताई काळे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

ग्रामसभेमध्ये मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्याबद्दल त्यांचे कौतुक करून मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे म्हणाले, निवडणूक आयोगाच्या वतीने दरवर्षी विशेष पुनरिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. सध्या हा कार्यक्रम राबविण्यात येत असून मतदारांनी मतदार यादीत आपले नाव असल्याचे तपासून घ्यावे. मतदार यादीत नाव नसल्यास तसेच 1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर 18 वर्षे पूर्ण होणाऱ्या सर्व नागरिकांनी मतदार नोंदणी करून घ्यावी. नव विवाहित महिलांचा नावात बदल, दुबार नावे व मयत असल्यास नाव वगळण्याची प्रक्रिया पूर्ण करुन घ्यावी, जेणेकरुन मतदार यादी निर्दोष व अद्ययावत तयार होईल.

राज्यसभा, लोकसभा, विधानपरिषद, विधानसभा बरोबरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये देखील आपल्याला मतदानाचा हक्क बजावता येण्यासाठी मतदार यादीत नाव नोंद झाल्याची खात्री करा, असेही त्यांनी सांगितले.श्री. देशपांडे म्हणाले, दिव्यांग मतदारांना घरुनच मतदान करता येण्यासाठी निवडणूक आयोगाच्या वतीने ‘पोस्टल बॅलेट’ (टपाली मतपत्रिका) ची सोय करण्यात आली आहे. याबरोबरच पीडब्ल्यूडी ॲप (PWD App) मोबाईल मध्ये डाऊनलोड करून घेतल्यास दिव्यांग मतदारांना मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी नोंदवता येते व ती त्यास निवडणूक आयोगातर्फे पुरवण्यात येते.

मतदारांसाठी ‘Voters Helpline App’ महत्वपूर्ण असल्याचे सांगून या अँप बद्दल तसेच निवडणूक आयोगाची भूमिका, मतदार ओळखपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे आदी बाबींची सविस्तर माहिती त्यांनी दिली.यावेळी मतदार यादीचे वाचन करण्यात आले. ग्रामसभेमध्ये मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले.

Team Satymev Jayate

Previous Post

कृषी विभागातर्फे उद्या जळगावात कार्यशाळेचे आयोजन

Next Post

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ३० नोव्हेंबर पर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे सांस्कृतिक संचालनालयाचे आवाहन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo