<
गुरुजी सारं काही आहे तुमच्यातआईची माया,
पित्याचं प्रेमसुर्याचे तेज, चंद्राची शीतलता गांधीजींची अहिंसा,
बुद्धांची क्षमाशीलता गुरुजी सारं काही आहे तुमच्यात
मातीला आकार देणाऱ्या कुंभाराचे कौशल्य
उभ्या जगताचे पालनपोषण करणाराशेतकरी सारखा ग्यानाचा पोशिंदा
बालमन जाणणारी मनकवडी विद्यागुरुजी सारं काही आहे तुमच्यात
एक व्यक्तिमत्वाची जडणघडण करणारी एक सुजाण नागरिक घडवणारी गुरुजी तुच एकमेव कलाकृती
गुरुजी सारं काही आहे तुमच्यात
विश्वास श्रद्धेचं स्थान तुमचं सर्व जगाच्या आशा आकांशा तुमच्यात देवाला मिळणारं देवपण
तुमच्यात गुरुजी सारं काही आहे तुमच्यात
म्हणूनच भगवंताने घडवलं गुरुजी नावाचं पात्र कारण त्याला माहिती होतं पुढची पात्र गुरुजीचं घडवणार म्हणूनच गुरुजी सारं काही आहे तुमच्यात
-श्रीमती. ज्योती लिलाधर राणे (७५८८१९२११०)उपशिक्षिका- जि.प. कन्या शाळा साळवा,ता.धरणगाव
जिल्हाध्यक्ष- अखिल प्राथमिक महिला शिक्षक संघ जळगांवसचिव- स्वरवेध फाऊंडेशन जळगांव