<
जळगाव(प्रतिनिधी)- येथील निवृत्ती नगर मधील केरळी महिला ट्रस्टचे कार्तिक स्वामी मंदीर दि १८ रोजी कार्तिका पोर्णिमा सूरू होवून दोन दिवसात लाखो भाविकांनी दर्शन घेतले. या वेळी शासनाचे नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले. आज मंदिराचे व्दार पुन्हा बंद करण्यात येणार आहे.
संपुर्ण केरळी पध्दतीने बांधलेले हे मंदीर गेल्या २५ वर्षापासून कार्तिकी पोर्णिमेनिमीत्त दर्शनासाठी खुले करण्यात येते. या मंदिरात कार्तिकस्वामी व्यतिरीक्त नवग्रह व इतर देवतांची देखिल मंदीर असून ते वर्षभर दर्शनासाठी खुले असते. मंदिरात दर्शनासाठी दरवर्षी भाविक दुरदेशातून मोठया प्रमाणात येत असतात. येथे केलेेला नवस पुर्ण होतो अशी आख्यायीका अनुभवावरून आलेली आहे.कार्तिक पौर्णिमानिमीत्त मंदिरात जय्यत तयारी करण्यात आली होती.
दि १८ रोजी दु. १२ वा मंदिराचे व्दार दर्शनासाठी उघडल्यापासून गेल्या दोन दिवसांनी लाखो भाविकांनी कोविड नियमांचे पालन करीत दर्शनाचा लाभ घेतला.गेले तिन दिवस संस्थापक अध्यक्ष वासंती अय्यर यांच्या मार्गदर्शनानुसार केरळी महिला ट्रस्टच्या सदस्या व कार्यकर्ते हा उत्सव शांततेत पुर्ण होण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत होते. भाविकांसाठी मंदिरातच मोकळया जागेत अभिषेकाची व्यवस्था करण्यात आल्याने अनेकांनी भगवान कार्तिक स्वामींना अभिषेक करतांना दिसून येत होते.
या तिन दिवसात अनेक मान्यवरांनी मंदिरात येवून दर्शनाचा लाभ घेतला. यात शहराचे आमदार राजूमामा भोळे, महापौर जयश्रीताई महाजन, माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी मंदिरात जावून पूजाअर्चा केली.