<
जळगांव(प्रतिनिधी)- देशाचे पंतप्रधान सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरले असून सतत वाढणारी महागाई, नोटबंदी, कोरोना काळात घेण्यात आलेले उशिराचे निर्णय, निवडणूका समोर ठेऊन घेण्यात आलेले माघारी निर्णय व विविध विषयाबाबत जनतेचा रोष वाढत असल्याने एक वर्षांपासून सुरु असलेले कायदे मागे घेण्यासाठी होत असलेले आंदोलन दडपण्याचे अयशस्वी प्रयत्न शेतकऱ्यांनी हाणून पाडले. उत्तर प्रदेशात व इतर राज्यातही भाजपची डागाळलेली प्रतिमा सुधारण्यासाठी कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय मोदींनी आज रोजी घेतला व तसा निर्णय जाहीर केला.
अन्यायकारक कृषी कायदे मागे झाल्याबाबत देशातील शेतकऱ्यांच्या मोठा विजय झाल्याने आज रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महानगर यांच्या वतीने प्रातिनिधीक स्वरूपात शेतकऱ्यांना शाल, श्रीफळ व फुलमाळा घालत लाडू भरवून महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रदेश प्रवक्ते योगेश देसले, महिला आघाडी अध्यक्षा मंगला पाटील, प्रतिभा शिरसाठ, प्रतिभा शिरसाठ, सुनील माळी, रमेश बहारे, जितेंद्र बागरे, अमोल कोल्हे, डॉ. रिजवान खाटीक, सुशील शिंदे, विशाल देशमुख, किरण राजपूत, दीप्ती भामरे, अशोक सोनवणे, दिलीप माहेश्वरी, राहुल टोके, नईम खाटीक, जितेंद्र चांगरे, अनिरुद्ध जाधव, अमोल सोनार, भल्ला तडवी, उज्ज्वल पाटील आदींच्या उपस्थितीत फटाके फोडून लाडू वाटतं जल्लोष साजरा करण्यात आला.