Wednesday, July 16, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

एसडी-सीडचा १४ वा शिष्यवृत्ती वितरण सोहळा संपन्न

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
21/11/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
एसडी-सीडचा १४ वा  शिष्यवृत्ती वितरण  सोहळा संपन्न

जळगाव(प्रतिनिधी)- “विद्यार्थ्यांनी किमतीच्या जगातून निघून मूल्यांच्या जगात जायचे आहे आणि तिथे जाऊन न थांबता उदात्त मूल्यांच्या जगात जायचे आहे. मी गरीब असेल, साधारण परिस्थिती असेल तरी खचून जायचे नाही. जगात सर्वात मौल्यवान जर काही असेल तर ते आईचे दुध आहे. मुल्ये सुद्धा आईच्या दुधा प्रमाणे आहेत, की ज्यांना विकताही येत नाही आणि विकतही घेता येत नाही.” असे मार्गदर्शन प्रसिद्ध गांधीवादी विचारवंत प्रा.डॉ. विश्वासराव पाटील (शहादा) यांनी केले.

एसडी-सीड अर्थातच सुरेशदादा शैक्षणिक व उद्योजक विकास योजने अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील गरजू आणि गुणवंत विद्यार्थ्यांना रविवारी माजी मंत्री एसडी-सीडचे आधारस्तंभ सुरेशदादा जैन यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला शिष्यवृत्तीचे वितरण ७, शिवाजी नगर येथे करण्यात आले.

प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत डॉ. विश्वासराव पाटील हे उपस्थित होते. या प्रसंगी व्यासपीठावर माजी कुलगुरू डॉ. के.बी.पाटील, शहराच्या महापौर सौ. जयश्री महाजन, माजी महापौर रमेशदादा जैन, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, राजा मयूर, मेजर नाना वाणी, मीनाक्षी जैन, गव्हर्निग बोर्ड चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी हे उपस्थित होते.

सोहळ्याचे प्रास्ताविक चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी यांनी केले तसेच आभार मीनाक्षी जैन यांनी मानले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश यावलकर, पुष्पा भंडारी आणि महेश गोरडे यांनी केले.

डॉ. विश्वासराव पाटील म्हणाले की जगातील प्रत्येकाच पाहिलं विद्यापीठ हे त्याची आई असते आणि सुरेशदादा यांच्या आई ज्यांच्या नावाने ही शिष्यवृत्ती दिली जाते त्यांच्या प्रतिमेस नमन करून मी धन्य झालो. या जगात तीन गोष्टींसाठी सर्व ओढाताण सुरु आहे ते म्हणजे सत्ता, संपत्ती आणि शस्त्र्. परंतु ते कोणत्याही प्रकारची शांती देऊ शकत नाही. पुढे त्यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले की, माणसाच माणसाचं जसं जगणं तस झुंजण असत व जस झुंजण असत तशी त्याची समर्पणाची भावना असते. शिक्षणामुळेच आपण मैत्री जोपासायला शिकतो, शिक्षणच आपल्याला सन्मान मिळवून देते. एसडी-सीडच्या माध्यमातून मिळणाऱ्या शिष्यवृत्तीच चीज व्हाव, संधीच सोन व्हाव असे परिश्रम विद्यार्थ्यांनी करावयाला पाहिजे असा सल्ला दिला.

१० विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात शिष्यवृत्ती वितरण कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते १० विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये महाजन सेजल सुनील, दैवज्ञ हर्षवर्धन राजेंद्र, वाणी ऋतुजा शशिकांत, साळुंखे ऋषिकेश अशोक, अहिरे राजश्री सिद्धार्थ, धनगर विशाल दगडू, बारी शारदा प्रकाश, जंगम गीतेश विजय, ब-हाटे हेमांगी योगेंद्र, चौधरी मयूर संजय या विद्यार्थ्यांचा समावेश होता. उर्वरित सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर शिष्यवृत्ती जमा करण्यात येणार आहे.

एसडी-सीड उपक्रमाची ध्येयपूर्तीकडे वाटचाल मागील चौदा वर्षात १४,३०० हून अधिक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभएकूण ३,४६९ विद्यार्थ्यांचे उच्चशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण४२,१८७ विद्यार्थ्यांना विविध विषयांवर प्रशिक्षणविद्यार्थी हितासाठी १४४ संस्थांसोबत सहकार्य करार८४ विद्यार्थ्यांना सेवाभावी संस्था किंवा व्यक्तींकडून दत्तक२३२५ युवतींना प्रमाणपत्रासह सशक्तीकरण प्रशिक्षण२८८ हून अधिक विद्यार्थ्यांना तज्ञांकडून वैयक्तिक समुपदेशनशिक्षकांना प्रशिक्षण व पालकांचे प्रबोधन

एसडी-सीड मेंटोरशिप प्रोग्राम घोषणा सुरेशदादा जैन यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला एसडी-सीड स्कॉलरशिप वितरण समारोहात विद्यार्थ्यांसाठी “एसडी-सीड मेंटोरशिप प्रोग्रामची” घोषणा करण्यात आली.

या मेंटोरिशप प्रकल्पा अंतर्गत ” मेंटोरिशपला म्हणजेच मार्गदर्शनाला प्राधान्य दिले जाणार आहे. एक मेंटोर साधारणत: ३ ते ५ विद्यार्थ्यांची जबाबदारी स्वीकारतील. इयत्ता १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांना विशिष्ट कौशल्ये असलेले, अनुभवी व व्यवसाय कुशल मार्गदर्शक विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधून त्यांचे शिक्षण पूर्ण होई पर्यंत त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. म्हणेजच विद्यार्थ्यांचे एकंदरीत व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान होईल.विद्यार्थ्यांना आर्थिक सहकार्याबरोबरच करिअर मार्गदर्शन तसेच जनरल मार्गदर्शन इत्यादी लहान लहान समस्यांच्या निवारणासाठी मार्गदर्शनाची आवश्यकता असते.

मेंटोर हे मानसिक, भावनिक व शैक्षणिक स्तरावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी उपलब्ध असतील व त्यांची सर्वांगीण वाढ होण्यासाठी तसेच त्यांच्यात उद्योजकता व योग्य नोकरी मार्गदर्शनासाठी आपल्या अनुभव ज्ञानाचा उपयोग करत संपूर्ण काळजी घेतील.आता पर्यंत शिष्यवृत्ती वितरणा बरोबरच इतर विविध योजनांद्वारे विद्यार्थ्यांना उद्योजकता कौशल्ये, प्रशिक्षण, समर इंटर्नशिप, विविध शैक्षणिक संस्था व साधनामध्ये सवलत इत्यादी योजनाद्वारे विद्यार्थी लाभान्वित होत असतात. या सर्व सुविधांसह या वर्षापासून पासून “एसडी-सीड मेंटोरशिप प्रोग्राम सुरु करण्यात येत आहे.

Team Satymev Jayate

Share this:

  • Twitter
  • Facebook
  • Telegram
  • WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

साहित्य संमेलनातून मराठी भाषेच्या समृद्धीचा जागर करणार

Next Post

एकूण पुरस्कारांपैकी ४० टक्के पुरस्कार महाराष्ट्राला ही अभिमानास्पद बाब

Next Post
समुद्राचे पाणी शुद्धीकरण प्रकल्पाबाबत सकारात्मक कार्यवाही करा -नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे

एकूण पुरस्कारांपैकी ४० टक्के पुरस्कार महाराष्ट्राला ही अभिमानास्पद बाब

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

गरजू विद्यार्थ्यांना सुलभ शिक्षणासाठी सायकल देणार – आमदार राजुमामा भोळे यांची घोषणा

गरजू विद्यार्थ्यांना सुलभ शिक्षणासाठी सायकल देणार – आमदार राजुमामा भोळे यांची घोषणा

महाराष्ट्र देशातले सर्वात मोठे इलेक्ट्रिक वाहन उत्पादन क्षमता असलेले राज्य ठरणार;मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

महाराष्ट्र देशातले सर्वात मोठे इलेक्ट्रिक वाहन उत्पादन क्षमता असलेले राज्य ठरणार;मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर राज्यातील वाहनांची गर्दी,वाहतूक कोंडी यावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण – मंत्री उदय सामंत

पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर राज्यातील वाहनांची गर्दी,वाहतूक कोंडी यावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण – मंत्री उदय सामंत

तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव

तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव

लोहारा येथे पावसाळ्यातही तीव्र पाणी टंचाई… आजही होतोय टँकरने गावाला पाणीपुरवठा

लोहारा येथे पावसाळ्यातही तीव्र पाणी टंचाई… आजही होतोय टँकरने गावाला पाणीपुरवठा

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

Video Player
https://youtu.be/TzzuE2yX3DI
00:00
00:00
03:54
Use Up/Down Arrow keys to increase or decrease volume.

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Select Category

    Powered By Tech Drift Solutions.

    No Result
    View All Result
    • Home
    • रोजगार
    • लैंगिक शिक्षण
    • माहितीचा अधिकार २००५
    • शैक्षणिक
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • लेख
    • संपादकीय

    Powered By Tech Drift Solutions.

    whatsapp-logo
    %d

      Notifications