<
भडगाव(प्रतिनिधी)- पैगंबर मोहम्मद (स.) बिल मुस्लिम आरक्षण व न्यायालयाने मान्यता दिलेले ५ % मुस्लिम आरक्षण लागु करण्यात यावे ते बिल येणार्या अधिवेशनात मंजुर करून तात्काळ तो कायदा लागु करावा, संत विचारांचा प्रसार प्रचार करणार्या ह.भ.प. किर्तनकार यांना शासनाकडुन मासिक वेतन सुरू करण्यात यावे.
वक्फ बोर्डाच्या जमिनीवर झालेले अवैध कब्जे हटवुन त्या जागेचा अल्पसंख्यांक समाजाच्या उन्नतीसाठी उपयोग करावा. सारथी, बार्टी, महाज्योती प्रमाणे मुस्लिम अल्पसंख्यांक समाजीतील विद्यार्थासाठी स्वतंत्र प्रशिक्षण संस्थेची स्थापना करावी.
या मागण्यांचे निवेदन भडगांव नायब तहसिलदार यांना वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यां तर्फे देण्यात आले. निवेदन देत वेळी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आण्णा मोरे, मुकेश नेतकर, रुपेश पवार, अमोल गायकवाड, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.