<
संविधान साक्षरता अभियान अंतर्गत जळगांव शहरातील कार्येकर्ता मुकेश राजेश कुरील यांचा दिल्ली पर्यंतचा प्रवास ५ नोव्हेंबर या दिवशी जळगांव येथुन सुरु झाला होता . अभियाना अंतर्गत सर्वांनी संविधान वाचाव आणि आत्मसात कराव असा संदेश ते सर्वांना करीत आहे . २३ नोव्हेंबर रोजी दिल्ली येथे कुरील यांचा संकल्प होता , परंतु मुकेश हे स्वत : शीच शर्यंत करत २२ रोजीच त्यांनी दिल्ली गाठली आहे . कुरील यांनी जवळपास १७०० किमी . चा प्रवास करत दिल्ली ला पोहाचले आहेत .
जळगांव , बुरहानपुर , आष्टा , भोपाल , विदीशा , सागर , हिरापुर , छत्तरपुर , महोबा , कानपुर , लखनौ , शहाजहाँपुर , मुरादाबाद , हापुर आणी शेवट दिल्ली असा सायकलने प्रवास केला . मुकेश हे जळगांव ते दिल्ली सायकलीने १८ दिवसात पोहोचले आहेत . त्यांनी या प्रवासादरम्यान संविधानाचा जागर , प्रचार प्रसार करत दिल्ली गाठली , दिल्ली येथे त्यांनी अगोदर डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या निर्वाण स्थळी जाऊन महामानवांना अभिवादन केले . मुकेश कुरील हे आता सलग चार दिवस राजधानी दिल्ली येथे संविधानाचा प्रचार प्रसार करणार आहेत . कुरील यांनी राष्ट्रपती भवन कार्यालयात मा . राष्ट्रपती महोदय यांना भेटण्यासाठी ई – मेल द्वारे विनंती केलेली आहे . २६ नोव्हेंबर हा संविधान असल्याने त्या दिवशी मा . राष्ट्रपती यांना निवेदन सादर करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे .