<
जळगाव(प्रतिनधी)- २० नोव्हेंबर हा दिवस सर्वत्र बालहक्क दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधत केशवस्मृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून रेल्वे भरकटलेल्या मुलांना आधार देणाऱ्या समतोल प्रकल्पाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
जळगाव शहरातील मोहाडी रस्ता, समता नगर परिसरात निर्वासित कामगार वस्ती मधील मुलांना खाऊ वाटप, विविध प्रकारचे खेळ खेळून बालकांचे हक्क याविषयात समतोलच्या व्यवस्थापिक सपना श्रीवास्तव यांनी माहिती दिली. कामगार वस्तीतील मुलांना व त्यांच्या पालकांना शिक्षणाचे महत्व यावेळी सांगण्यात आले. कार्यक्रम यशस्वितेसाठी प्रदिप पाटील, विश्वजीत सपकाळे, दिपक पाचपांडे, प्रशांत चौधरी, योगानंद कोळी यांनी परिश्रम घेतले.