<
जळगाव, दि. 26 (प्रतिनिधी) – जळगाव येथील गांधी रिसर्च फाऊंडेशन आणि मानव विकास मिशन, महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग यांच्या संयुक्त विद्यमाने चोपड़ा तालुक्यातील दुर्गम भागातील गौऱ्यापाडा येथे मधुमक्षिका पालन जनजागृती मेळावा आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गांधी रिसर्च फाऊंडेशनचे सहकारी सुधीर पाटील तर प्रमुख पाहुणे जळगाव जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी राजेंद्र चव्हाण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी मधुमक्षिका पालन, त्याबाबतच्या महत्त्वपूर्ण सोदाहरण सूचना उपस्थितांना देण्यात आल्या. गौऱ्यापाडा गांव व परिसरातील लाभार्थी आदिवासी बांधवांनी मधुमक्षिका पालन संदर्भात तज्ज्ञांसोबत चर्चा करून शंकाचे निरसन करून घेतले. हा कार्यक्रम २५ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता.
त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमासाठी गावातील पोलिस पाटील नानसिग किसन बारेला,दारासिंग बारेला, मगन बारेला, सिमसिग बारेला, जामसिग बारेला, बाळकृष्ण चौधरी, रूपेश पाटील, जिजाबराव पाटील, विक्रम अस्वार व ग्रामस्थ महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर सुरवाडे यांनी केले .गांधी रिसर्च फाउंडेशनचे सहकारी चंद्रकांत चौधरी यांनी आभार प्रदर्शन केले.