<
जळगांव(प्रतिनिधी)- केसीई सोसायटी संचलित गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील विद्यालयात भारतीय संविधान गौरव दिन साजरा करण्यात आला तसेच 26 / 11 च्या मुंबई अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.सर्वप्रथम शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा पाटील यांच्या हस्ते भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच भारतीय संविधानाच्या उद्देशिके च्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन याप्रसंगी केले तर उपशिक्षक योगेश भालेराव यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र भारताची जगप्रसिद्ध अशी राज्यघटना लिहिली की जी सर्वांना समानतेचा अधिकार देणारी सर्व जाती, धर्म, पंथ, लिंग भेद दूर करून सर्वांना एकत्रित करणारी, सन्मानाचे आणि नैतिकतेचे दर्शन घडविणारी जगाला आदर्शवत अशी राज्यघटना आहे अशा शब्दात भारतीय संविधानाचा गुणगौरव केला.
प्रसंगी उपशिक्षिका सरला पाटील, कल्पना तायडे, धनश्री फालक, स्वाती पाटील, अशोक चौधरी, सूर्यकांत पाटील, देवेंद्र चौधरी, सुनील नारखेडे, सुधीर वाणी आदी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.