<
जळगाव(प्रतिनिधी)- चित्रकला स्पर्ध च्या माध्यमातून विद्यार्धी यांच्या कलागुणांना मोठी वाव मिळेल. त्यामुळे या स्पर्धेतून चांगले चित्रकार समोर यावे. त्यांच्यासाठी ही स्पर्धा एक चांगले व्यासपीठ आहे, असे प्रतिपादन आमदार राजू मामा भोळे यांनी केले. एक्सेलंट ड्रॉइंग फाउंडेशन व श्री राजपूत करणी सेना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय ऑनलाइन चित्रकला स्पर्धा च्या शुभारंभ प्रसंगी आमदार भोळे बोलत होते.
हा ऑनलाइन सोहळा प्रभात चौकातील महाराणा प्रतापसिंह महाराज यांच्या पुतळ्याजवळ झाला. या स्पर्धेची माहिती एक्से लंट ड्रॉइंग फाउंडेशन चे संचालक सतीश चौधरी यांनी दिली. या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक आरोग्य धन संपदा फाउंडेशन चे संचालक जितेंद्र पाटील, श्री राजपूत करणी सेनेचे विभागीय अध्यक्ष प्रवीण पाटील, जिल्हाध्यक्ष विठ्ठल सिंग मोरे, जिल्हा उपाध्यक्ष आशिष सिंग हाडा, मंडळ अधिकारी योगेश्वर नानवरे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण सपकाळे यांनी केले.
सूत्रसंचालन श्री राजपूत करणी सेनेचे खानदेश विभागीय कार्याध्यक्ष विलास सिंग पाटील यांनी केले. या वेळी शेतकरी संघटनेचे चोपडा तालुकाध्यक्ष भरत देशमुख, नाजनिन शेख आदी उपस्थित होते.