<
सांगली(जि. मा. का.)- सांगली येथील माता रमाई आंबेडकर उद्यान विकसीत होत आहे. यामध्ये होत असलेली कामे अत्यंत उत्कृष्ट असून हे उद्यान नागरिक व लहान मुले यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त व आरोग्यदायी ठरेल. सांगलीच्या मध्यवर्ती ठिकाणी हे उद्यान होत असून ही अत्यंत आनंदाची बाब आहे, असे प्रतिपादन केंद्रिय सामाजिक न्याय व सबलीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.
केंद्रिय सामाजिक न्याय व सबलीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगली येथील माता रमाई आंबेडकर उद्यानास भेट दिली त्या प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, महानगरपालिका उपायुक्त राहुल रोकडे, महानगरपालिका समाज कल्याण सभापती सुबराव मद्रासी, माजी महापौर विवेक कांबळे, नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, नगरसेविका सौ. अनारकली, शेखर इनामदार, संजय कांबळे, संदेश भंडारे यांच्यासह महानगरपालिकेचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी उद्यान विकसीत करण्यासाठी सुरू असलेल्या कामांची सविस्तर माहिती जाणून घेतली व या कामासाठी त्यांच्या फंडातून आर्थिक मदत देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.