<
जळगांव(प्रतिनिधी)- तालुक्यातील कानळदा आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात 27 नोव्हेंबर रोजी INO आणि आयुष मंत्रालय अंतर्गत “रोग मुक्त भारत अभियान ” या निमित्ताने शिक्षाकांना व 500 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना निसर्गोपचार मधील प्रथमोपचारांवर डॉ. निशिगंधा नेमाडे आणि डॉ. सुहास नेमाडे यांनी मार्गदर्शन केले.
यात निसर्गोपचार पद्धतीने विविध आजारांवर कशाप्रकारे मात करता येते याचे मार्गदर्शन करण्यात आले. यात सर्दी, खोकला, अंगदुखी, डोकेदुखी, डोळेदुखी, खांदेदुखी, ताप आदी आजारांवर घरच्या घरी कसे उपचार करावे ही माहिती देण्यात आली. तसेच मडपॅक, स्टीमबाथ, हैड्रोथेरपी, ऐक्युप्रेशर ची माहिती दिली. यावेळी शाळेचे प्राचार्य कैलास चौहान व इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.