<
जळगांव(प्रतिनिधी)- काल दि.५ रोजी जळगाव जिल्ह्यातील माथाडी कामगार कल्याण मंडळ कार्यालवर एक दिवसीय ठिय्या आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन तथा बहुजन क्रांती मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने माथाडी कामगार कल्याण मंडळ,जळगाव ऑफिसवर आंदोलन करण्यात आले विद्युत महापारेषण कम्पनी या मध्ये जे सुरक्षा रक्षक नौकरीचे नियमन कल्याण कायदा अधिनियम १९८१ याकायद्या अंतर्गत योजना २०१२ कायद्याची अंमलबजावणी होत नसून जळगाव ,धुळे,नंदूरबार ह्या जिल्हातील सुरक्षा रक्षक अनेक वर्ष पासून खाजगी ठेकेदार व महापारेशन कंपनी मधील अधिकारी यांच्या कडून पिळवणूक होत आहे कामगार कल्याण मंडळ तर्फे या खाजगी सुरक्षा रक्षकांना दि २९/०८/२०१९ रोजी कामावर रुजू होण्याचे लेखी पत्रक मिळणार होते परंतु आत्ता पर्यंत त्यांना कुठलेही लेखी पत्रक या मंडळ मार्फत मिळाले नाही जेव्हा याचा जाब विचारण्यासाठी कामगार मंडळ च्या ऑफिसवर कामगार आले असता तेथे जबाबदार अधिकारी त्याठिकाणी उपस्थित नव्हते त्यामुळे त्यातही रिकामी खुर्चीला हार घालण्यात आला.याठिकाणी जळगाव,धुळे,नंदूरबार या जिल्हाभरातून कामगार तथा सुरक्षा रक्षक आले होते यावेळी विजय सुरवाडे(जिल्हा संयोजक संविधान बचाव संघर्ष समिती, बहुजन क्रांती मोर्चा),राजेश गायकवाड(अध्यक्ष महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन),बापूसाहेब जावळे(सचिव महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन) मनोज ढिवरे(जिल्हा संयोजक बहुजन क्रांती मोर्चा धुळे जिल्हा),राजाभाऊ काजळे(उपाध्यक्ष महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन),खुशाल सोनवणे(भारत मुक्ती मोर्चा),राहुल सोनवणे(भारतीय बेरोजगार मोर्चा),गौरव सुरवाडे (बहुजन मुक्ती पार्टी) याठिकाणी उपस्थित होते. जर माथाडी कामगार कल्याण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन ताबडतोब नाही दिल्यास तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन तसेच सुरक्षा कामगार स्वतः आत्मदहन करतील असा इशारा बहुजन क्रांती मोर्चा यांच्या तर्फे देण्यात आला आहे. असे मा.विजय सुरवाडे जिल्हा संयोजक संविधान बचाव संघर्ष समिती जळगांव यांनी सत्यमेव जयतेच्या प्रतिनिधींशी बोलतांना सांगितले.