<
चाळीसगाव(प्रतिनिधी)- तालुका विधी सेवा समिती, चाळीसगाव व वकील संघ चाळीसगाव आणि महात्मा फुले आरोग्य संकुल, ग्रामीण रुग्णालय, चाळीसगांव यांचे संयुक्त विद्यमाने आज ‘जागतिक एचआयव्ही/एड्स दिन’ या विषयावर शिबीर घेण्यात आले. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई व मा. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव यांच्या निर्देशनाप्रमाणे दि. ०१/१२/२०२१ रोजी महात्मा फुले आरोग्य संकुल, ग्रामीण रुग्णालय, चाळीसगांव येथे ‘जागतिक एचआयव्ही/एड्स दिन’ या विषयावर शिबीर घेण्यांत आले.
सदर कार्यक्रमाची प्रस्तावना रणजित सखाराम गव्हाळे, समोपदेशक, ग्रामीण रुग्णालय, चाळीसगांव यांनी केली. सदर प्रसंगी किशोर पाटील, समोपदेशक, ग्रामीण रुग्णालय, चाळीसगांव यांनी एचआयव्ही / एड्स बाबत कार्याची माहिती सांगीतली. तसेच ॲड. संतोष पाटील, सदस्य, वकील संघ चाळीसगांव यांनी ॲसीड अटॅक या विषयावर भाषण केले.
एन. के. वाळके, अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती चाळीसगांव तथा दिवाणी न्यायाधीश, व.स्तर चाळीसगांव यांनी जागतिक एच.आय.व्ही. / एड्स दिनाबाबत मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमास ॲड. पी.एस.एरंडे, अध्यक्ष वकीलसंघ चाळीसगांव, डॉ. अजीज शेख, वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय चाळीसगांव, दिपक पाटील, कार्यालयीन अधिक्षक, ग्रामीण रुग्णालय चाळीसगांव व कर्मचारी वृंद, ग्रामीण रुग्णालय चाळीसगांव उपस्थित होते.
कार्यक्रमाचे शेवटी जागतिक एड्स दिनानिमित्त उपस्थितांनी शपथ घेतली. डॉ. मंदार करंबेकर, वैद्यकीय अधिक्षक यांनी आभार मानले. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ॲड. कविता जाधव, सचिव वकीलसंघ चाळीसगांव यांनी केले. उपरोक्त कार्यक्रमाचे नियोजन डी.के.पवार, दिनेश डिगराळे, शिपाई यांनी यशस्वीरित्या पार पाडले.