<
भडगाव(प्रतिनिधी)- सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात नुकताच नवीन मतदार नोंदणी, प्रचार व प्रसार कार्यक्रम संपन्न झाला. महाविद्यालयातील १८ वर्षे पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांची मतदार म्हणून नोंदणी करून घेणे, त्यांच्यामध्ये मतदानासंबंधी जागृती निर्माण करणे, तसेच लोकशाही निवडणूक पद्धतीचा प्रचार व प्रसार करणे यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भडगावचे तहसीलदार मुकेश हिवाळे, निवडणूक शाखेचे नायब तहसीलदार भालेराव उपस्थित होते. त्यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन. एन. गायकवाड होते. त्यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांचे मतदार म्हणून नोंदणी करण्यात आली.
विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. दीपक मराठे, साहाय्यक विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. सी. एस. पाटील यांनीही आपले मत मांडले. डॉ. एस. डी. भैसे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रा. डी.ए. मस्की यांनी केले तर राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. जी.एस. अहिरराव यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाला प्रा. प्रदीप वाघ, प्रा.एस.ए. कोळी, प्रा. गजानन चौधरी, प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांची उपस्थिती होती.