<
जळगाव(प्रतिनिधी)- महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना जळगांव जिल्ह्याच्या वतीने तसेच जिल्हा शासकीय रुग्णालय यांच्या पुढाकाराने शहरातील भास्कर मार्केट येथे सलग दुसऱ्या दिवशीही कोविड -१९ लसीकरण शिबिर घेण्यात आले. यात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. याप्रसंगी २१० नागरिकांना लसीचा पहिला व दुसरा डोस देण्यात आला.
शिबिरासाठी शासकीय रुग्णालयाचे डॉ. रोहित देसाई, कन्हैया मोरे, रितेश नेवे यांनी परिश्रम घेतले. पोलीस बॉईज संघटना असे अनेक सामाजिक उपक्रम वेळोवेळी राबवत असते लवकरच व मोफत कॅन्सर कॅम्प शहरात घेण्यात येईल या संदर्भातली माहिती राहुल सूर्यवंशी यांनी दिली. कोविड लसीकरणाची सुरुवात जिल्हा परिषदेतील पाणीपुरवठा विभागातील जितेंद्र अटवाल यांच्या लसीकरणाने झाली.
याप्रसंगी संघटनेचे जिल्हा संपर्क प्रमुख कुणाल मोरे, जिल्हाध्यक्ष राकेश कांबळे, उपाध्यक्ष आरिफ पिंजारी, जनसंपर्क अधिकारी चेतन निंबोळकर, वाहतूक आघाडीचे अकील शेख, विद्यार्थी आघाडीचे किरण राजपूत, दिलीप साळुंखे, मनोज सपकाळे, भूषण सुरळकर आदी उपस्थित होते.सदर शिबिरासाठी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील, सामाजिक कार्यकर्ते मुकुंद गोसावी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.