<
जळगांव(धर्मेश पालवे):-देशभर व राज्यभर गाजलेल्या तत्कालीन जळगांव नगरपालिका व आताच्या महानगरपालिका घरकुल घोटाळयात माजी मंत्री श्री सुरेश जैन ,श्री गुलाबराव देवकर,श्री चंद्रकांत सोनवणे,यांच्यासह विद्यमान ४८ नगरसेवकांचा समावेश आहे. या सर्व दोषींवर धुळे न्यायालयाने गुन्हे दाखल करून अपहाराची रक्कम व सदर गुन्ह्यासाठी शिक्षा ही ठोठावली आहे. तरीही गुन्ह्यातील सूत्रधार मा सुरेश जैन हे दोषी आढळून आले आहेत, व महानगरपालिका करीता त्यांनी कोणतेही चांगल्या प्रकारे योगदान दिलेले नसल्याचं बोललं जातं आहे.म्हणून मनपातील दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात माजी मंत्री श्री सुरेश जैन यांचे लावण्यात आलेले तैलचित्र तात्काळ हटवावे आणि त्या जागी छत्रपती शिवाजी महाराज,किंवा राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्राचे अनावरण करावे. अन्यथा तसे न केल्यास जळगांव शहरात याबाबत जनजागृती अभियान राबवण्यात येईल असे विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, जिल्हा जागृत जनमंच चे जेष्ठ समाज सेवक शिवराम पाटील,शाहिद भगतसिंग मनपा कर्मचारी संघटन चे कॉ अनिल नाटेकर,माहिती अधिकार कार्यकर्ते मा गुप्ता सर यांनी मनपा च्या दालनात आंदोलन करत मा महापौर, मनपा आयुक्त,मनपा प्रभारी नगर सचिव, व मनपा कार्यालय अधीक्षक जळगांव शहर महानगर पालिका यांचे लक्ष वेधले, तर आंदोलनात उवस्थित नागरीकांनी ही याबाबत आपले म्हणणे व्यक्त करत सदर फोटो हटवावे असे सांगितले. वरील सर्व माहिती आंदोलनकर्ते मा शिवराम पाटील यांनी सत्यमेव जयतेच्या प्रतिनिधींशी बोलतांना सांगितले.