Thursday, July 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

नाकावरून ट्रोल होणाऱ्या महिलेने दिले असे काही उत्तर

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
05/12/2021
in व्हायरल चेक
Reading Time: 1 min read
नाकावरून ट्रोल होणाऱ्या महिलेने दिले असे काही उत्तर

शरीरावर एखाद्या विचित्र ठिकाणी जन्मखूण असेल तर ती त्या व्यक्तीसाठी लाजिरवाणी बाब ठरू शकते. अशीच एक घटना आता समोर आली आहे. नाकावर जन्मखूण असल्याने एका महिलेच्या नाकाची तुलना हरणाच्या नाकाशी करून तिला ट्रोल केलं जात आहे. 

रेवन नावाची महिला सोशल मीडिया साईट टिकटॉकवर तिच्या नाकासाठी प्रसिद्ध आहे. डेली स्टार वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, या महिलेच्या नाकाच्या टोकावर तपकिरी रंगाची एक जन्मखूण आहे. ही जन्मखूण पाहिल्यावर तिला नाक बसवलं आहे का, असा प्रश्न पडतो. बरेच जण तिची तुलना `बांबी` या हरणाच्या पाडसाशी करतात. बांबी ही हरणावर आधारित एक कार्टून फिल्म आहे. खरं तर रेवन खूप लोकप्रिय आहे.

“प्रत्येक माणसात अनेक गोष्टी असतात. त्या नुसत्या डोळ्यानं दिसू शकत नाहीत” असं रेवन म्हणते. एकीकडे काही जण तिला ट्रोल करतात, तर दुसरीकडे काही जण तिचं कौतुकदेखील करतात. काही जण तिला `क्यूट` असंही म्हणतात. हरणासारखं दिसणं ही काही वाईट गोष्ट नाही. ‘तू बांबी हरणासारखी सुंदर आहेस,’ असंही काही जण प्रतिक्रिया देताना म्हणतात. ‘तुमची जन्मखूण खरंच खूप सुंदर आहे,’ असं एका व्यक्तीनं व्हिडिओवर कमेंट करताना लिहिलं आहे. 

रेवन तिला ट्रोल करणाऱ्या लोकांवर अजिबात नाराज होत नाही. रेवन नेहमीच सकारात्मक विचार करते. नुकताच रेवनने एक व्हिडिओ शेअर केला. “मी माझ्या नाकावर कधीच शस्त्रक्रिया करणार नाही. कारण माझं माझ्या नाकावर खूप प्रेम आहे आणि नाकावरची जन्मखूण मला खूप जास्त आवडते” असं तिने आपल्या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. तसेच ‘मी सगळ्यांपेक्षा वेगळी दिसते आणि ही गोष्ट मला खूपच आवडते,’ असंही ती या व्हिडीओमधून स्पष्ट करते.

Team Satymev Jayate

Previous Post

WhatsApp युजर्ससाठी आले नवीन फीचर : सहज बनवू शकता तुमचे स्वतःचे फोटो Sticker !

Next Post

राज्यस्तरीय ग्रंथालय नियोजन समितीत रिटा बाविस्कर यांची निवड

Next Post
राज्यस्तरीय ग्रंथालय नियोजन समितीत रिटा बाविस्कर यांची निवड

राज्यस्तरीय ग्रंथालय नियोजन समितीत रिटा बाविस्कर यांची निवड

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

स्वर्णिम बुक ऑफ रेकॉर्ड्सतर्फे ॲड. विजय काबरा यांचा गौरव

स्वर्णिम बुक ऑफ रेकॉर्ड्सतर्फे ॲड. विजय काबरा यांचा गौरव

टॅलेंट सर्च व द्वारकाई ब्लास्टर्सचा विजयी सलामी; पंकज महाजन आणि मनोज पाटील सामनावीर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo