<
अमळनेर (प्रतिनिधी) : राज्य ग्रंथालय नियोजन समितीच्या सात सदस्यात एकमेव नामनिर्देशित सदस्य म्हणून रिटा बाविस्कर यांची निवड झाली आहे.
या समितीच्या अध्यक्षपदी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अप्पर मुख्य सचिव किंवा प्रधान सचिव , राजाराम मोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानचे महासंचालक , प्रतिष्ठान च्या अध्यक्षांचे प्रतिनिधी , राज्य ग्रंथालय संघटनेचे अध्यक्ष किंवा सचिव , महाराष्ट्राचे ग्रंथालय संचालक यांचा या समितीत समावेश आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे कार्यासन अधिकारी अनिल सावरे यांनी २ डिसेम्बर रोजी शासन निर्णयाद्वारे समिती गठीत केली आहे.
राजाराम मोहनरॉय ग्रंथालय प्रतिष्ठान अंतर्गत राज्यस्तरीय ग्रंथालय नियोजन समितीत अमळनेर येथील रिटा बाविस्कर यांची तीन वर्षकरिता अशासकीय सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.