<
नाशिक(जिमाका वृत्तसेवा)- दिनांक ०५ डिसेंबर २०२१ : स्वाभिमानाचा वारसा सांगणाऱ्या मराठी भाषेला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी साहित्यिकांनी झटत राहावे, त्यासाठी त्यांना राज्यकर्त्यांनी आवश्यक ते सहकार्य करावे, असे प्रतिपादन ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपाच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी खासदार शरद पवार यांनी केले.आज भुजबळ नॉलेज सिटीच्या कुसुमाग्रज नगरीत 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप खासदार पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला, यावेळी ते बोलत होते.
यावेळी पालकमंत्री तथा स्वागताध्यक्ष छगन भुजबळ, प्रमुख अतिथी म्हणून माजी न्यायमुर्ती नरेंद्र चपळगावकर, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार हेमंत गोडसेआमदार डॉ. सुधीर तांबे, माणिकराव कोकाटे, हिरामण खोसकर, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. कौतिकराव ठाले-पाटील, कार्यवाह डॉ. दादा गोऱ्हे, कोषाध्यक्ष रामचंद्र काळुंखे, मुख्य निमंत्रक जयप्रकाश जातेगावकर, प्रमुख कार्यवाह हेमंत टकले, संजय करंजकर, शंकर बोऱ्हाडे, विश्वास ठाकूर आदी उपस्थित होते.