<
आरोग्य विभागाने एकाच दिवशी केले विक्रमी 12,000 नागरिकांचे लसीकरण
जामनेर:दि.(05.12.21)ओमायक्रॉन या कोरोनाच्या विकसित झालेल्या प्रजातीचा धोका टाळण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत ,मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भिमाशंकर जमादार यांच्याकडून विविध उपाययोजना हाती घेऊन लसीकरणाची गती वाढवण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
या अनुषंगाने जामनेर तालुक्यात अधिक प्रमाणात नागरिकांना कोरोना लस देऊन सुरक्षित ठेवण्याबाबत आठवळ्यापूर्वीच नियोजन करण्यात आले.
तहसीलदार अरुण शेवाळे यांच्या अध्यक्षतेखाली गटविकास अधिकारी जे.व्ही.कवळदेवी, मुख्यधिकारी नगर पालिका जामनेर चंद्रकांत भोसले, मुख्याधिकारी नगर परिषद शेंदूर्णी साजित पिंजारी,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.विनय सोनवणे, डॉ.हर्षल चांदा, गटशिक्षणाधिकारी विजय सरोदे,बालविकास प्रकल्प अधिकारी पदम परदेशी,बालविकास पर्यवेक्षिका निशा तेली यांनी केलेल्या नियोजनाची प्रभावीपणे अंबालबजावणी करून आठवळाभरात चाळीस हजार नागरिकांचे कोरोना लसीकरण पूर्ण करण्यात आले.
डॉ.राजेश जैन,डॉ.पल्लवी राऊत,डॉ.मनोज पाटील,डॉ.संदीप कुमावद,डॉ.नरेश पाटील,डॉ.दानिश खान,डॉ.मनोज तेली,डॉ.मोहितकुमार जोहरे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात आरोग्य यंत्रणा कोरोना लसीकरणाचे कामकाज करीत आहे.
तालुक्यात सात दिवसात ४०,००० नागरिकांना कोरोना लसीकरण करण्यात आले. यामध्ये १,९९,२६६ नागरिकांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतलेला आहे व ७२,९८५ नागरिकांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहे.
ओमायक्रॉन व्हेरियंटचा धोका टाळण्यासाठी प्रशासनाकडून काही निर्बंध घालून देण्यात आलेले आहेत.
ज्या नागरिकांनी लसीचा एकही डोस घेतलेला नाही त्यांना प्रवास करणेच नाही तर बाजारात खरेदी सुद्धा करता येणार नाही. तसेच सर्व सरकारी आस्थापना मध्ये लसीकरण झालेल्या नागरिकांना च प्रवेश देण्यात येत असल्याने तसेच तहसीलदार कार्यालय, नगरपालिका,तलाठी कार्यालय, ग्रामपंचायत यांच्या काडुन मिळणारे दाखले हे कोरोना लसीकरण झालेल्यांना नागरिकांना च अदा करण्याबाबत वरिष्ठांच्या सुचना असल्याने व जि.प.उर्दु, मराठी विभागाचे सर्व शिक्षक, सर्व अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस,गटप्रवर्तक आशा स्वयंसेविका,ग्रामपंचायत यांनी एकत्र मिळून व सुयोग्य पध्दतीने नियोजन केल्यामुळे कोरोना लसीकरणाचे प्रमाण अधिक वाढल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे यांनी सांगितले.
जामनेर व शेंदूर्णी येथे नगरपालिकेच्या सहकार्याने वार्ड निहाय तसेच सकाळी, संध्याकाळी, रात्री लसीकरण करण्यात येत आहे.
कोरोना लसीकरणासाठी आरोग्य विभागाचे अधिकारी व विशेषतः कर्मचारी हे सरकारी पातळीच्या पुढे जाऊन दिवस रात्र कामकाज करीत असल्यामुळेच तालुक्यात लसीकरणाचा मोलाचा पल्ला गाठता आला असल्याचे गटविकास अधिकारी जे.व्ही.कवळदेवी यांनी सांगितले.
कोव्हिडं विषाणूचा धोका दोन्ही डोस घेतलेल्यांना कमी असतो त्यांना जरी लागण झाली तरीही ती व्यक्ती गंभीर होत नाही म्हणून सर्वांनी लसीचे दोन्ही डोस लवकर पूर्ण करावे स्वतः सुरक्षित राहावे व दुसऱ्यांना सुरक्षित ठेवावे असे आवाहन डॉ.विनय सोनवणे यांनी केले.