<
भुसावळ(प्रतिनिधी)- येथील सखी श्रावणी महिला बहुउद्देशिय संस्थेच्यावतीने जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधुन व स्नेहदिप निराधार अंध आश्रमाचे वर्धापन दिनानिमित्त अंध व अपंग बांधवांना किराणा वाटप करण्यात आले.
येथील यावल रोड वरील तापी नदी काठी असलेले श्री परशुराम व माता रेणुका देवी मंदीरात सोमवार ६ डिसेंबर रोजी आयोजीत कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणून प्रमुख पाहुणे रुही जावळे, काजल जावळे, अध्यक्ष सुभाष पाटील, डाॅ.खाचणे हे होते.प्रसंगी मान्यवरांचे हस्ते स्नेहदिप निराधार अंध आश्रमातील ३० गरजु अपंग भगिनी व बांधवांना किराणा किट वाटप करण्यात आले.
प्रारंभी ईशस्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. तसेच महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना उपस्थित मान्यवरांनी शब्दसुमनांनी आदरांजली वाहून अभिवादन केले. कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात राजश्री नेवे यांनी संस्थेच्या कार्याचा थोडक्यात आढावा सांगून संस्था गेल्या 6 वर्षां पासून अंध बांधवाकरीता मदत करीत आहे व यापुढे देखील करणार म्हणून उपस्थित बांधवाना ग्वाही दिली.
अध्यक्ष सुभाष पाटील, डाॅ.खाचणे तर प्रमुख पाहुणे श्रीमती जावळे यांनी संस्थेच्या उपक्रमांचे कौतुक करीत सर्वोतोपरी सहकार्य करणार याबद्दल ग्वाही दिली यावेळी अध्यक्ष सुभाष पाटील, डाॅ.खाचणे, उज्वला बागुल यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी संस्थेचे नेवे, माया चौधरी, वंदना झांबरे, पत्रकार उज्वला बागुल, स्मिता माहुरकर, भाग्यश्री नेवे, मंदाकीनी केदारे, कामिनी नेवे, राजश्री बादशहा, मीना राजपूत, कविता महाले आदी महिला भगीनी व सभासद व पदाधिकारी उपस्थीत होते.