<
जळगाव(प्रतिनिधी)- निद्रिस्त समाज हा विवेकशून्य असतो. यामुळे विचार मंदावतात.व्यवस्था परिवर्तन हा आंबेडकरी चळवळीचा गाभा आहे.असे विचार प्रा.डॉ. सत्यजीत साळवे यांनी व्यक्त केले.डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त संविधान जागर समितीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आयोजित केलेल्या अभिवादन सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मुकुंद सपकाळे होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विचारांचे शस्त्र दिले आहे. पण आपण गतीहिन होत चालल्यामुळे चळवळीचा पाया कमकुवत होण्याचा धोका समोर आहे. असे परखड विचार प्रा.डॉ.सत्यजीत साळवे यांनी व्यक्त करून सर्व समाज घटकांनी एकसंघ होऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या दिशादर्शक मार्गावरून वाटचाल केली पाहिजे असे आवाहन केले.
संविधान जागर समितीचे मुख्य संयोजक मुकुंद सपकाळे यांनी अध्यक्षीय भाषणातून देशासमोर शक्ती चा वाढता धोका असल्याचे सांगून सर्वांना समान न्याय हक्काचा अधिकार देणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर
यांचा विचार हाच आपल्याला तारणारा आहे असे सांगितले. यावेळी महापौर जयश्री महाजन यांनीही आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारत ससाणे यांनी केले. कार्यक्रमाला आ. राजूमामा भोळे, भंते सुगतवांस महाथेरो, भंते संघरत्न थेरो, नगरसेवक सुरेश सोनवणे, अमोल कोल्हे, दिलीप सपकाळे , प्रा.वळवी, राजू मोरे, चंदन बिऱ्हाडे, वाल्मीक सपकाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
सूत्रसंचालन हरिश्चंद्र सोनवणे यांनी तर आभार रमेश सोनवणे यांनी मानले. कार्यक्रमाला ऍड. राजेश गोयर, बाबुराव वाघ, जयपाल धुरंधर, नीलेश बोरा, युवराज सुरवाडे, हरीश कुमावत, नीलू इंगळे, रंजना तायडे, भारती म्हस्के, अभिजित रंधे, यांच्यासह शेकडो कार्यकर्ते हजर होते. यशस्वीतेसाठी समाधान सोनवणे, महेंद्र केदार, आकाश सपकाळे, अभिलाष वाघ, भारत सोनवणे, मिलिंद तायडे, जगदीश सपकाळे, आदींनी परिश्रम घेतले.