<
जळगांव(प्रतिनिधी)- प.न.लुंकड कन्याशाळेतील उपशिक्षक प्रवीण धनगर यांनी तयार केलेली क्यू.आर.कोड निर्मितीतीतून ई बुक्स व्दारे ग्रंथालय आपल्या दारी पुस्तक सूचीचे प्रकाशन शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष अँड. सुशिल अत्रे यांच्या शुभहस्ते झाले.
सदर पुस्तक सूचीत ३५ पुस्तकांचा समावेश असून विद्यार्थ्यांना या पुस्तीकेतून अवांतर वाचनाची नक्कीच सवय लागणार आहे. सदर पुस्तक सूची ही विनामूल्य असून विद्यार्थ्यांना पी.डी.एफ स्वरूपात मोफत मिळणार आहे.
शहरातील बहूतेक शाळेतील मुख्याध्यापकांना एक पुस्तक सूची अंक मोफत देण्यात आला असून तेथील विद्यार्थी याचा लाभ घेतील अशी आशा उपक्रम प्रमुख प्रवीण धनगर यांनी व्यक्त केली आहे. कोरोनामुळे शाळा बंद असल्याने मुलांचे वाचन जवळजवळ बंद झाले होते परंतु या उपक्रमाचा उपयोग करून मुलांना अवांतर वाचनाची गोडी लागू शकते अशी प्रतिक्रिया शाळेच्या मुख्याध्यापिका स्वाती नेवे व सकाळ विभाग प्रमुख मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केली.
सदर पुस्तक सूचीचे कौतुक शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष अँड. सुशील अत्रे, सचिव अभिजित देशपांडे, विश्वस्त व सदस्य प्रेमचंद ओसवाल, सदस्य प्रा.शरच्चंद्र छापेकर व इतर सर्व मान्यवरांनी केले असून शालेय पालकांनीही शुभेच्छा दिल्या आहेत.