<
अमळनेर – पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय, अमळनेर येथे महामानव, बोधिसत्व भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एस, पाटील यांचे अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉ. अस्मिता सरवैया यांनी आपल्या प्रास्ताविकात बाबासाहेबांना अभिवादन करताना सांगितले की, भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकार, समता, न्याय, बंधुता आणि अभिवृत्ती स्वातंत्र्यावर विद्यार्थ्यांना प्रबोधन केले. स्वयंसेवक संदेश संदानशिव ,पंकज भोई,दीपक विश्वेश्वर,दिव्यांनी किशोर पाटील या विद्यार्थांनी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर भाष्य केले. विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. अनिता खेडकर यांनी आजच्या युगातही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार किती महत्वपूर्ण आहेत, या वर भाष्य केले.
तर अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एस, पाटील यांनी काव्यातून आपल्या भावना व्यक्त केल्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रती व्यक्त होतांना म्हणाले की, मुक्या वेदनांना शब्द दिलेस तू… फाटलेल्या पंखांना आकाश दिलेस तू… तुझ्याच चेतनेने जीवनास अर्थ आला, युगायुगांच्या शोषितांचा तूच उद्धार केला, हे महामानवा कोटी कोटी वंदन तुजला, हे महामानवा कोटी कोटी वंदन तुजला… हे महामानवा कोटी कोटी वंदन तुजला…. बाबासाहेबांनी माणसाला माणूस म्हणून जगण्याचा मूलभूत अधिकार तर दिलाच परंतु भारतातील असंख्य जाती धर्माच्या लोकांना एकाच व्यवस्थे अंतर्गत आणून समता तत्व दिले, म्हणून बाबासाहेब हेच खऱ्या अर्थाने आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात. कार्यक्रम यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास विभाग तसेच महाविद्यालयातील प्रा.विजयकुमार वाघमारे, डॉ. जे. एस. सोनवणे, डॉ.भरत खंडागळे, डॉ. श्वेता वैद्य, डॉ. एस आर चव्हाण, प्रा. डी. आर. ढगे, प्रा. सी.ए. बोरसे, कार्यालयीन अधिक्षक श्री अनिल वाणी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले