अमळनेर- तालुक्यातील आदर्शगाव सुंदरपट्टी येते दि.८ डिसेंबर पासून अखंड हरिनाम कीर्तन सप्तहाचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील या सप्तहाचे आयोजन केले असून यंदाचे त्यांचे हे २६ वे वर्ष आहे.

दि. ८ डिसेंबर ते १५ डिसेंबर दरम्यान ह्या कीर्तन सप्तहाचे आयोजन करण्यात आले असून रोज सकाळी काकड आरती व दुपारी ४-५ प्रवचन तसेच संध्याकाळी ५ ते ८ हरिपाठ व रात्री ९ ते ११ कीर्तन असे ह्या कार्यक्रमाचे नियोजन असणार आहे. या वेळी ह. भ. प.योगेश महाराज वरझडीकर , ह. भ. प.सतीलाल महाराज म्हसदीकर,ह. भ. प.सुनीताताई महाजन, ह. भ. प चंद्रकांत महाराज,ह. भ. प कैलास महाराज,ह. भ. प मधुमाऊली महाराज,ह. भ. प लीलाधर महाराज,ह. भ. प सावता महाराज हे आपली सेवा देणार आहेत.
१४ रोजी पालखी सोहळा तसेच १५ रोजी महा महाप्रसादाचे आयोजन केले आहे तरी सदर कार्यक्रमात सर्वांनी भाग घ्यावा असे आवाहन सुंदरपट्टी ग्रामस्थ व सरपंच श्री.सुरेश पाटील यांनी केले आहे.