<
जळगाव प्रतिनिधी : नुतन मराठा महाविद्यालयातील एफ वाय बी ए च्या वर्गातील विद्यार्थी श्रीकांत लासुरकर याची आकाशवाणी महानिदेशालय आयोजित स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्तआयोजित AirNxt स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त करत यशस्वी निवड झाली असून सर्वत्र कौतुक होत आहे.
श्रीकांतने, आत्मनिर्भर भारत, भारतीय मुलींना सशक्त करण्यासाठी नवीन भविष्यवादी दृष्टीकोन, स्कील इंडीया, रोल मॉडेल अशा विषयांवर आधारित, कथाकथन,काव्य, वक्तृत्व आणि उत्स्फूर्त भाषण अशा विविध प्रकारात उत्कृष्ट सादरीकरण केले होते. श्रीकांत लासुरकर आता १९ तारखेला होणाऱ्या कार्यक्रमात महाराष्ट्रातील एकूण २६ आकाशवाणी केंद्रांवर आर जे म्हणून सादरीकरण करेल.
त्याच्या या उज्वल यशात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एल पी देशमुख, कला शाखेचे उपप्राचार्य डॉ एन जे पाटील, वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य डॉ राजेंद्र देशमुख,विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ आर बी देशमुख, सर्व शाखेचे विभाग प्रमुख, प्राध्यापक तथा नाट्यशास्त्र विभागाचे प्रा डॉ राहूल संदानशिव आणि मराठी विभागाचे प्रा रत्नाकर कोळी यांचे मार्गदर्शन लाभले.या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.