<
जळगांव(प्रतिनिधी)- जिल्हा क्रीडा कार्यालय जळगाव जळगाव जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व क्रीडा सप्ताह निमित्त जिल्हा क्रीडा संकुल येथे जिल्ह्यातील क्रीडा शिक्षकांसाठी आयोजित दोन दिवसीय ॲथलेटिक्स खेळाच्या कार्यशाळेस उत्साहात सुरुवात झाली प्रारंभी भारतीय लष्कराचे चीफ ऑफ डिफेन्स स्व बिपिन रावत यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
कार्यशाळेचे उदघाटन महापौर जयश्री महाजन यांनी दीपप्रज्वलन करून अॅथलेटिक्स खेळाच्या साहित्याचे पूजन करून केले याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित,शिवछत्रपती पुरस्कारार्थी डॉ प्रदीप तळवलकर, जिल्हा क्रीडा संघटक मार्गदर्शक फारुख शेख, सी.ए कल्पेश जोशी, मुख्याध्यापक डी.व्ही चौधरी, मंगेश भोईटे जिल्हा जिल्हा क्रीडाशिक्षक महासंघाचे प्रशांत कोल्हे,अजय देशमुख व मंगेश भोईटे, प्रा ईकबाल मिर्झा, क्रीडा अधिकारी एम के पाटील, सुजाता गुल्हाणें, राज्य क्रीडा मार्गदर्शक अरविद खांडेकर, मिनल थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स उत्कृष्ट खेळाडू पुरस्कार शालेय गट मयुरी सावंत धरणगाव, महाविद्यालयीन गट आदित्य महाजन रावेर, खुला गट राष्ट्रीय खेळाडू संजय तायडे जळगाव, उत्कृष्ट मार्गदर्शक निलेश पाटील, उत्कृष्ट संघटक सचिन महाजन यांना देण्यात आले या प्रसंगी जिल्ह्यातील राष्ट्रीय वरिष्ठ खेळाडू रवींद्र मोरे,अनिल पठाडे ,सचिन नेरपगार, इरफान शेख यांची राष्ट्रीय मास्टर्स अॅथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला सदर कार्यशाळेत जिल्ह्यातील सुमारे चारशे क्रीडाशिक्षक सहभागी झाले आहेत.
या कार्यशाळेत भारतीय ॲथलेटिक्स महासंघाचे राष्ट्रीय तांत्रिक अधिकारी श्री राकेश सावे पालघर यांनी बेसिक ऑफ ट्रॅक इव्हेंट, ट्रॅक अँड फिल्ड तर राष्ट्रीय तांत्रिक अधिकारी चंद्रकांत पाटील पुणे यांनी बेसिक ऑफ हर्डल्स व बेसिकऑफ रेस वॉकिंग या बाबींवर सखोल मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन असोसिएशनचे कार्याध्यक्ष डॉ पी आर चौधरी यांनी तर प्रास्ताविक जिल्हा असोसिएशनचे सचिव राजेश जाधव यांनी केले.
कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा क्रीडा कार्यालय व जळगाव जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहे.